Raj Thackeray : राज ठाकरे पुण्यातील सभेत कडाडले, म्हणाले, मशिदीतून फतवे निघत असतील तर हिंदूंचे….


Raj Thackeray : राज्यातील चौथ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकांसाठी १३ मे रोजी मतदान होत आहे. तत्पूर्वी प्रचारसभांचा धडाका सुरू असून दिग्गज नेते प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत.

वातावरणात बदल होऊन काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली, त्यामुळे वातावरात गारवा आला आहे. मात्र, राजकीय नेत्यांच्या भाषणांनी राजकीय वातावरण तापल्याच पाहायला मिळत आहे.

यावेळी राज ठाकरे म्हणाले, आता मशिदीतून फतवे निघत आहेत की, काँग्रेसला मतदान करा. मशिदीतील मुल्ला-मौलवी हे फतवे काढत असतील तर आता मी फतवा काढतो महायुतीला मतदान करा, हिंदूंचे मोहोळ उठू द्या.. असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुणे शहरात महायुतीच्या उमेदवारासाठी जाहीर सभा घेतली. यावेळी, मौलवी आणि मशिदींमधून फतवे निघत असल्याचं सांगत फतवे काढणाऱ्यांना ठणकावलं. तसेच, काँग्रेस व उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल करत अजित पवारांच्या राजकीय भूमिकेचं कौतुकही केले आहे. Raj Thackeray

ज ठाकरे यांनी सुमारे ४० मिनिटांच्या भाषणात शहराच्या बकाल झालेल्या स्थितीला कोण जबाबदार आहे, शहरात जाती-पातीचे विष कोण कालवत आहे. मेट्रोचे जाळे, वाहतूक कोंडी, नवी पिढी पुणे शहर का सोडतेय अशा मुद्यांना हात घातला.

राज म्हणाले, बाबरी मशीद पाडल्यावर या देशात राम मंदिर कधी होईल, असे मला कधीच वाटले नव्हते. पण झाले राम मंदिर ते केवळ मोदींमुळे. मी केवळ स्तुती करायची म्हणून करीत नाही, मला जे पटले ते पटले, नाही पटलं तर मी विरोधातही बोललो आहे.

आता काँग्रेसला मतदान करा म्हणून मशिदीतून मौलवी फतवे काढत आहे. काय समजता तुम्ही मुस्लिम समाजाला, तुमच्या घरची गुरंढोरं आहेत का ती. पण काही मुस्लिम बांधव सुजाण आहेत. त्यांना कळतं काय सुरू आहे.

पण मशिदीतले मुल्ला-मौलवी जर काँग्रेसला मतदान करा, उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करा म्हणून सांगत असतील तर मीही फतवा काढतो महायुतीला मतदान करा, हिंदूंचे मोहोळ उठू द्या… जेम्स लेन प्रकरण अचानक काढलं गेलं, कोण कुठला तो जेम्स लेन, तो ओरडून सांगत होता की, मी कुणालाही भेटलो नाही.

इथे राम गणेश गडकरींचा पुतळा फोडला गेला ते नितीन गडकरींचे नातेवाईक आहेत म्हणून. अहो राम गणेश गडकरी कोण होते हे माहिती आहे का.. असा सवाल करीत राज ठाकरे म्हणाले, याच राजकारणाला कंटाळून नवी पिढी हे शहर, हा देश सोडून जात आहे. एकदा सर्वांनी मिळून बसूया आणि या शहराच्या विकासावर चर्चा करूया. असे ते म्हणाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!