Rain Update : महाराष्ट्रात अतिमुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत, आज राज्यात कसं असेल हवामान?, जाणून घ्या…
Rain Update : महाराष्ट्रात पावसानं दमदार हजेरी लावली आहे, सर्वदूर पाऊस झाला आहे. राज्याच्या काही भागांमध्ये तर ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. याचा मोठा फटका शहरी भागांसोबतच ग्रामीण भागातील नागरिकांना बसला आहे.
जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस सुरू आहे. रेल्वे मार्गावर पाणी साचल्यानं वाहतूक कोलमडली आहे. शहरातील सखल भागात मोठ्याप्रमाणात पाणी साचले आहे.
तर रेल्वेच्या सेवेवर देखील परिणाम झाला आहे. अनेक गाड्या रद्द झाल्या आहेत. दरम्यान, आजही हवामान विभागानं राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील बहुतांश भागात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर कोकणातील इतर भागात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. Rain Update
तसेच मुंबईसह परिसरात देखील आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि संपूर्ण विदर्भात आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांनी पावसाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.