रेल्वे मंत्र्यांकडून उरुळीकांचनला ट्रान्सपोर्टेशनची घोषणा! मात्र आठ वर्षापासून लोकल रेल्वे सेवेच्या पूर्ततेचा विसर; प्लॅटफार्म झाले, डेमू, इमो धावतेय पण लोकल सेवा नाहीच…

जयदिप जाधव
उरुळीकांचन : केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुणे शहराला उत्तर विभागीय रेल्वे कडून अधिक सक्षमपणे जोडण्यासाठी पुणे शहराच्या स्थानकांच्या विस्तारासाठी उरुळीकांचन रेल्वे स्थानकावरून लांब पल्याच्या रेल्वे ट्रान्सपोर्टेशनसाठी स्थानकाचा विकास करणार असल्याचे घोषित केले असल्याने या घोषणेमुळे रेल्वे प्रवाश्यांत समाधान व्यक्त होत आहे. मात्र मुख्य रेल्वे मंत्रालय उरुळीकांचनला रेल्वे ट्रान्सपोर्टेशनची सेवेसाठी विस्तारीत करीत असले तरी स्थानिक रेल्वे प्रवाश्यांच्या दृष्टीने दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या लोकल रेल्वे प्रयोजनाला इलेक्ट्रीकेशन पूर्ण होऊन आठ वर्षाचा काळ लोटूनही रेल्वे मंत्रालयाने लोकल सेवा सुरू होण्यासाठी मुहूर्त लावला नसल्याने स्थानिक रेल्वे सुविधेला डोळेझाक कशासाठी चालविली जात असल्याचा प्रश्न उपस्थित होत आहे.
रेल्वेला मध्य व उत्तर विभागाला जोडण्यासाठी उरुळी कांचन रेल्वे स्थानक अतिशय महत्त्वाचे स्थानक आहे. या रेल्वे स्थानकातून पुणे, मुंबई तसेच उत्तर रेल्वे विभागातील महत्त्वाचा शहरांतील रेल्वे प्रवासासाठी या ठिकाणाहून अधिकची मागणी आहे. या स्थानकावरून प्रवासी संख्या हजारोंच्या पटीत असल्याने या स्थानकाचे महत्त्व रेल्वे उत्पन्नात वाढले आहे. या स्थानकावर पुणे, पिंपरी चिंचवड तसेच मुंबई शहरांसाठी नोकरीनिमित्त प्रवास करण्याऱ्या प्रवाश्यांची संख्या आहे. पुणे शहराचे वाढत उपनगर तसेच दौंड व पुरंदर तालुक्यातूनउरुळीकांचन रेल्वे स्थानकावरुन प्रवाश्यांसाठी सुविधा म्हणून या स्थानकाचा वापर प्रवाश्यांकडून होत आहे. परंतु या स्थानकावर पुणे शहर, दौंड, बारामती अशी वर्दळ असणाऱ्या रेल्वे प्रवाश्याची अपवादात्मक सेवा असल्याने तसेच लांब पल्याच्या रेल्वे गाड्यांचा थांबा नसल्याने या ठिकाणावरून रेल्वे प्रवासाचा साधनांचा मर्यादा आहेत.
पुणे रेल्वे स्थानकातून मध्य रेल्वे विभागाने पुणे- दौंड- लोणावळा अशी लोकल रेल्वे सुविधा सुरू करण्यासाठी रेल्वेचा मार्ग इलेक्ट्रीकेशन केला आहे. हा संपूर्ण मार्गाचे २०१४ ते २०१६ या कालावधीत इलेक्ट्रीकेशन काम पूर्ण झाले आहे. मात्र आठ वर्षाचा काळ उलटूनही या मार्गावर लोकल रेल्वे सुविधा सुरू होऊ शकली नाही. या मार्गावर लोकल सेवेचा अंतर्भाव असलेल्या इमो व डेमू या दोन्ही रेल्वेचा रेक उपलब्ध आहे. तसेच या दोन्ही रेल्वे या मार्गावरून धावत आहे. मात्र अपवादात्मक सकाळी व संध्याकाळी अशा फेऱ्यांची संख्या असल्याने या स्थानकावरून नोकदार वर्ग तसेच प्रवासी वर्गाला सेवा मिळत नसल्याने या ठिकाणी लोकल रेल्वे सुरू करण्याची मागणी आहे. या मार्गावर लोकल सेवा सुरू करण्यासाठी इलेक्ट्रीकेशन, प्लॅटफार्म सुधारणा, राखीव रेल्वे ट्रॅक आदींची सुविधा केली आहे. मात्र गेली आठ वर्षांपासून सर्व रचना होऊन लोकल रेल्वे सुविधा उपलब्ध होऊ न शकल्याने लोकल सेवेअभावी ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी आवस्था या मार्गाची आहे.
उपनगरीय दर्जा कधी?
पुणे शहराला जोडण्यासाठी उपनगरीय रेल्वेचे जाळे तयार करणे अतिशय महत्त्वाचे बनले आहे. त्यासाठी पुणे- दौंड -लोणावळा अशी लोकल सेवा सुरू करण्यासाठी या मार्गाला उपनगरीय सेवेचा दर्जा देण्याचे गरजेचे आहे. या रेल्वे मार्गात दौंड रेल्वे जंक्शनचा आ.राहुल कुल यांच्या प्रयत्नांंनी पुणे रेल्वे विभागात झाला असला तरी लोकल रेल्वेच्या सर्व रचना होऊनही रेल्वे सुविधा सुरू न झाल्याने प्रवाश्यांत नाराजी आहे.
प्लॅटफार्म सुधारले सुविधा जलद मिळावी..
मोदी सरकारने अमृत योजनेअंतर्गत रेल्वे प्लॅटफार्मचा कायाकल्प केला आहे.उरुळीकांचन रेल्वे स्थानकाचा कायापालट झाला आहे. हे स्थानक अतिशय महत्त्वाचे असल्याने लांबपल्याचा रेल्वे गाड्या या ठिकाणी थांबाव्यात अशी मागणी आहे.रेल्वे गोवा एक्स्प्रेसाठी जेजुरी स्थानकाला थांबा देते, बुलेट ट्रेन मुंबई- सोलापूरच्या रेल्वे प्रवाश्यात जेऊरला स्थान मग उत्तरेकडील लाब पल्याचा उरुळी कांचन रेल्वे स्थानकाला स्थान का देत नाही हा मोठा प्रश्न आहे.
-प्रकाश जगताप – अध्यक्ष उरुळीकांचन रेल्वे प्रवासी संघ