Rahul Narwekar : अध्यक्षांचे वेळापत्रक आम्हाला अजिबात मान्य नाही! न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना झापलं…


Rahul Narwekar नवी दिल्ली : विधानसभा अध्यक्षांकडून आमदार अपात्र प्रकरणी सुरु असलेल्या कारवाईवर सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी ही वेळकाढूपणा प्रक्रिया सुरु असल्याचे प्रथम दर्शनी दिसत असल्याचे मत व्यक्त केले.

या सुनावणी दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, अध्यक्षांचं वेळापत्रक आम्हाला अजिबात मान्य नाही, असं म्हणत सरन्यायाधीश विधानसभा अध्यक्ष आणि त्यांच्या कार्यपद्धतीबाबत प्रचंड नाराज झाले होते. फक्त वेळकाढूपणाचं धोरण अध्यक्ष राबवत असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे, असे सरन्यायाधीशांनी म्हटलं आहे. Rahul Narwekar

तुम्ही आदेशाची पायमल्ली करत आहात. सुधारीत वेळापत्रक मंगळवारपर्यंत द्या. विधानसभा अध्यक्षांचे वेळापत्रक न्यायालयाने मान्य केले नाही. त्यांना नवीन वेळापत्रक देण्यासाठी न्यायालयाने आदेश दिले आहेत. याप्रकरणी पुढच्या निवडणूकापर्यंत तरी निर्णय घ्या.

विधानसभा अध्यक्षपद घटनात्मक असले तरी आम्ही आदेश देऊ शकतो, असेही सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी म्हणत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना एक प्रकारे इशाराच दिला आहे. न्यायालयाने त्यांच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

याबाबत पुढच्या निवडणुकीच्या आधी निर्णय घेतला नाही तर विधानसभा अध्यक्षांसमोरील कारवाई निरर्थक ठरेल. अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांवर नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे आता अध्यक्षांना लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागेल.

निर्णय घेण्याचे सर्वाधिकार अर्थातच अध्यक्षांकडे आहेत. परंतु, ११ मे रोजी या संपूर्ण प्रकरणातील निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिलेला आणि अपात्रतेचा निर्णय घेण्याचे सर्वाधिकार अध्यक्षांकडे सोपवले होते, याला तब्बल पाच महिने उलटून गेले आहेत.

परंतु, पाच महिन्यांनंतरही अपात्रतेची सुनावणी वेगानं पुढे का जात नाही? याबाबत ताशेरे ओढत आजच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं अत्यंत कडत शब्दांत विधानसभा अध्यक्षांना सुनावलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं निर्देश दिल्यानंतर आता विधानसभा अध्यक्षांची भूमिका काय असणार? हे पाहने महत्त्वाचे ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!