Rahul Narvekar : विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड, महाविकास आघाडीकडून कोणाचाही अर्ज नाही…

Rahul Narvekar : महाराष्ट्रात महायुतीची सत्तास्थापना झाल्यानंतर सध्या विधानसभेचे कामकाज सुरु आहे. मुंबईत राज्याचे विशेष तीन दिवसीय अधिवेशन सुरु आहे. शनिवारी ७ डिसेंबर आणि रविवारी ८ डिसेंबर असे दोन दिवस सत्ताधारी आणि विरोधक आमदारांचा शपथविधी पार पडला.
यानंतर आज विशेष अधिवेशनाचा तिसरा आणि शेवटचा दिवस आहे. आज विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली. अखेर भाजप नेते आणि आमदार राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे.
महाविकास आघाडीकडून अध्यक्षपदासाठी कुणीही अर्ज भरला नसल्याने राहुल नार्वेकरांची बिनविरोध निवड झालीय. आज विधासभेच्या विशेष अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी नार्वेकरांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार आहे. राज्यातील २८८ आमदारांचा शपथविधी पार पडल्यानंतर सोमवारी विधानसभेच्या नव्या अध्यक्षाची अधिकृत निवड होणार आहे. Rahul Narvekar
दरम्यान, राहुल नार्वेकर यांनी गेल्या अडीच वर्षांमध्ये मोठ्या कौशल्याने विधानसभेचे कामकाज हाताळलं होते. ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतच्या वादात राहुल नार्वेकर यांनी निर्णायक भूमिका बजावली होती.
त्यामुळे राहुल नार्वेकर चांगलेच चर्चेत आले होते. त्यांच्या कुशल कामगिरीच्या पार्श्वभूमीमुळेच राहुल नार्वेकरांना पुन्हा एकदा विधानसभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळणार आहे. आज विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची अधिकृत घोषणा करण्यात येईल.