Rahul Kul : दौंड तालुक्यातील ग्रामीण मार्गांच्या दुरुस्तीसाठी अर्थसंकल्पात २० कोटींचा निधी मंजूर, आमदार राहुल कुल यांची माहिती..


Rahul Kul : दौंड तालुक्यातील ग्रामीण मार्गांच्या दुरुस्तीसाठी अर्थसंकल्पात २० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अशी माहिती दौंड तालुक्याचे आमदार ॲड. राहुल कुल यांनी दिली आहे.

देशाच्या प्रगतीचा मार्ग हा गावखेड्यांच्या प्रगतीने प्रशस्त होत असतो, ग्रामीण भागातील पायाभूत विकासासाठी महत्वाचा घटक असतो तो ग्रामीण मार्ग, याच ग्रामीण मार्गाच्या दुरुस्तीसाठी यापूर्वी फक्त जिल्हा नियोजन समितीकडून निधी उपलब्ध होत होता, ग्रामीण मार्गाच्या दुरुस्तीचा असलेला अनुशेष भरून काढण्यासाठी राज्याच्या डिसेंबरच्या पुरवणी अर्थसंकल्पात या ग्रामीण मार्गच्या कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी दौंड तालुक्याचे आमदार ॲड. राहुल कुल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे केली होती.

तसेच दौंड तालुक्यासाठी सुमारे २० कोटी रुपयांचा निधी या माध्यमातून मिळाला असून, यामुळे ग्रामीण भागात देखील मजबूत रस्त्यांचे जाळे यामुळे निर्माण होणार आहे. असे आमदार कुल म्हणाले आहे. Rahul Kul

दौंड तालुक्यातील ग्रामीण मार्ग रस्त्याच्या कामासाठी मिळालेला निधी पुढील प्रमाणे …

1) गार बेटवाडी ते नवीन गार रस्ता ग्रा. मा. 92 रस्त्याची सुधारणा करणे – 1 कोटी
2) पेडगाव साखरी पुनर्वसन हनुमाननगर रस्ता ग्रा. मा. 171 रस्त्याची सुधारणा करणे – 2 कोटी
3) प्रजिमा 46 ते राजेगाव फार्म ग्रा. मा. 115 रस्त्याची सुधारणा करणे – 2 कोटी
4) इजिमा – 176 ते मेमाणेवाडी ते प्रजिमा 29 रस्ता (ग्रा. मा. 155) सुधारणा करणे – 1 कोटी
5) प्रजिमा – 29 ते मेमाणवाडी रस्ता (ग्रा. मा. 262) रस्त्याची सुधारणा करणे – 50 लाख

6) इजिमा – 174 ते गाडे वस्ती रस्ता (ग्रा. मा. 174) रस्त्याची सुधारणा करणे – 1 कोटी 25 लाख
7) दहिटणे ते पिलानवाडी रस्ता (ग्रा. मा. 168) रस्त्याची सुधारणा करणे – 40 लाख
8) मिरवडी ते रा. मा. 68 ला मिळणारा (ग्रा. मा. 31) रस्त्याची सुधारणा करणे – 1 कोटी 50 लाख
9) पानवली गावठाण ते कांबळेनगर ग्रा. मा. 280 रस्त्याची सुधारणा करणे – 60 लाख
10) देवकरवाडी पिलाणवाडी ग्रा. मा. 244 रस्त्याची सुधारणा करणे – 1 कोटी

11) गलांडवाडी संगम ग्रा. मा. 66 रस्त्याची सुधारणा करणे – 2 कोटी
12) फडतरेवस्ती ते लवांडेवस्ती ते प्रजिमा 64 रस्ता ग्रा. मा. 164 सुधारणा करणे – 70 लाख
13) गोपाळवाडी ते दत्तनगर रस्ता ग्रा .मा. 183 रस्त्याची सुधारणा करणे – 50 लाख
14) देऊळगाव गाडा गावठाण ते पडवी पाटी रस्ता ग्रा. मा. 46 रस्त्याची सुधारणा करणे – 1 कोटी 50 लाख
15) रा. मा. 123 ते होले वस्ती रस्ता सुधारणा करणे ग्रा. मा. 134 ची सुधारणा करणे – 1 कोटी

16) मलठण (प्रजिमा 79) ते लिंगाळेश्वर रस्ता करणे ग्रा.मा 260 रस्त्याची सुधारणा करणे – 2 कोटी
17) रावणगाव शिवेचा मळा ते पूर्व वस्ती रा. मा. 9 ला मिळणारा रस्ता ग्रा. मा. 229 रस्त्याची सुधारणा करणे – 1 कोटी

डिसेंबर च्या पुरवणी अर्थसंकल्पात मिळालेल्या या भरघोस निधीमुळे दौंड तालुक्यातील ग्रामीण भागात रस्त्यांचे मजबूत रस्त्यांचे जाळे यामुळे निर्माण होणार असल्याने शेतकरी व नागरिकांनी आमदार कुल यांचे आभार मानले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!