पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणात राहुल गांधींचा उडी! म्हणाले, मतचोरी करुन बनलेल्या सरकारची जमीन चोरी, मोदींजींचे शांत राहणं….

नवी दिल्ली : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजिव पार्थ पवार यांच्या कंपनीवर पुण्यातील जमीन खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप होत आहे. कालच या प्रकरणात तिघांवर गुन्हे दाखल झाली. मात्र, 99 टक्के अमेडिया कंपनीचे शेअर हे पार्थ पवार यांच्या नावावर असताना त्याच्यावर गुन्हा दाखल न होता.

दिग्विजय पाटील याच्या नावावर या कंपनीचा फक्त 1 टक्का शेअर आहे आणि पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला. 99 टक्के शेअर पार्थ पवार याच्या नावावर असताना देखील त्याच्यावर गुन्हा दाखल न झाल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत.

या शिवाय राज्याच्या आयटी धोरणाचा लाभ घेत स्टॅम्प ड्युटी देखील कमी आकारण्यात आली. स्टॅम्प ड्युटी 500 रुपये आकारण्यात आली. पार्थ पवार यांच्या जमीन खरेदीच्या प्रकरणावरुन मोठं वादळ उठलं आहे.

याच मुद्यावरुन लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरी करुन बनलेल्या सरकारनं केलेली जमीन चोरी असल्याचं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं शांत राहणं खूप काही सांगतं, असं राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना या प्रकरणी प्रश्न विचारले आहेत.
महाराष्ट्रात 1800 कोटी रुपयांची सरकारी जमीन, जी दलितांसाठी आरक्षित होती, फक्त 300 कोटी रुपयांमध्ये मंत्र्यांच्या मुलाच्या कंपनीला विकण्यात आली. त्यावरील स्टॅम्प ड्युटी देखील हटवण्यात आली. म्हणजेच एक लूट आणि त्यावर कायदेशीर शिक्कामोर्तब करत सूट देण्यात आली.
जे मतचोरी करुन बनलेलं सरकार आहे, त्यांच्याकडून करण्यात आलेली ही जमीन चोरी आहे. त्यांना माहिती आहे, कितीही लूट केली तरी मतचोरी करुन पुन्हा सत्तेत येऊ शकतात.
ना लोकशाहीची परवा, ना जनतेची, ना दलितांच्या अधिकारांची
मोदी जी, आपकी चुप्पी बहुत कुछ कहती है –
क्या आप इसीलिए खामोश हैं क्योंकि आपकी सरकार उन्हीं लुटेरों पर टिकी है जो दलितों और वंचितों का हक़ हड़पते हैं?
मोदी जी, तुमची शांतता खूप काही सांगते,
तुम्ही यासाठीच शांत आहात की तुमचं सरकार त्या लुटारुंवर टिकलेली आहे, जे दलित आणि वचितांचे अधिकार हिसकावून घेतात?
राहुल गांधी यांनी दोन दिवसांपूर्वी हरियाणातील मतचोरीचा मुद्दा मांडला होता. पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणात देखील राहुल गांधी यांनी मतचोरीचा मुद्दा आणला आहे.
