राहुल गांधींच्या विधानामुळे ओबीसींचा अपमान, भाजप राज्यभर आंदोलन करणार- चंद्रशेखर बावनकुळे
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीमोदी आडनावाच्या टिप्पणीमुळे तेली समाजाचाच नाही तर एकूणच ओबीसींचा अपमान झाला आहे. त्याचा भाजपने तीव्र शब्दात निषेध केला आहे. तसेच अनेक ठिकाणी आंदोलने सुद्धा छेडण्यात आले आहे. अशातच या टिपण्णी विरोधात सुरत न्यायालयाने मोदी आडनाव प्रकरणी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना दोषी ठरवले आहे. त्यांच्या वक्तव्याविरोधात सुरत कोर्टात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, 2019 मध्ये राहुल गांधींनी मोदी आडनाव असलेले सगळे चोर का आहेत, कर्नाटकमध्ये झालेल्या सभेत असे विधान केले होते. गुरुवारी झालेल्या सुनावणीत सुरतच्या सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे, त्यांचे समर्थक याप्रकरणी राज्यभर आंदोलन करत असून मोदी सरकार विरोधात घोषणा देत आहे. .
यासंदर्भात बोलताना बावनकुळे म्हणाले की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जाहीर सभेत मोदी यांच्या आडनावावरून अपमानास्पद सवाल उपस्थित केला होता. तसेच राहुल गांधी यांनी तेली समाजासोबतच एकूणच ओबीसी समाजाचा अपमान केल्यामुळे आपण त्यांचा निषेध करत आहोत. आम्हाला जातीयवादी ठरवण्यापेक्षा राहुल गांधी यांच्या या प्रकारामुळे काँग्रेसची जातीयवादी वृत्ती समोर आली आहे असे सुद्धा बावनकुळे म्हणाले.
राजेशाही मानसिकतेतून अजूनही राहुल गांधी बाहेर आले नाही आहेत, असे यावरून स्पष्ट होते. देशामध्ये कायदा व संविधान सर्वश्रेष्ठ आहे, मग त्यापुढे कोणी कितीही मोठा असू दे. हे एकंदरीत न्यायालयाच्या निर्णयात दिसते, असेही बावनकुळे म्हणाले आहेत.