गौतमीच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा राडा! दगडफेकीत एक महिला जखमी…


नगर : गौतमी पाटील हिने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे. तिच्या कार्यक्रमाला अनेक तरुण हजेरी लावतात. तिच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी पाहायला मिळते.

गौतमी पाटील हिच्या नगर येथे मंगळवारी झालेल्या कार्यक्रमात हुल्लडबाजांनी गोंधळ घातला. या गोंधळादरम्यान दगडफेक झाल्यामुळे वातावरण काही काळ तंग झाले होतं. या दगडफेकीत एक महिला किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.  मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला.

मिळालेल्या माहिती नुसार, नगरच्या नागापूर येथे गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होते. यावेळी काही तरुणांनी हुल्लडबाजी करत गोंधळ घातला. हुल्लडबाजांनी इतका गोंधळ घातला की त्यांनी थेट दगडफेक करायला सुरुवात केली.

या दगडफेकीत एक महिला किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. गोंधळामुळे गौतमी पाटीलला अर्ध्यावरच कार्यक्रम बंद करावा लागला. यापुढे आयोजकांनी व्यवस्थित बंदोबस्त ठेवला नाही तर कार्यक्रम रद्द करण्याचा इशारा गौतमी पाटील हिने दिला आहे.

गोंधळ झाल्यास मी कार्यक्रम घेणार नाही, अशी भूमिका गौतमी पाटील हिने जाहीर केली आहे. दरम्यान हुल्लडबाजांनी गोंधळ घातल्याने गौतमी पाटीलने अर्ध्यावरच आटोपला. आयोजकांकडून कार्यक्रमासाठी व्यवस्थित बंदोबस्त नसेल तर कार्यक्रम करणार नसल्याचं देखील गौतमीने स्पष्ट सांगितलं आहे.

 

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!