पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळसह सात जणांची निर्दोष मुक्तता….


पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड, गँगस्टर आणि हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ता शरद मोहोळ व इतर सात जणांची पुणे सत्र न्यायालयाने आज निर्दोष मुक्तता केली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश वि. डी. निंबाळकर यांनी हा निकाल दिला. मोहोळ याच्यासह सहकाऱ्यांवर पौड पोलीस स्टेशन येथे अपहरण, खंडणी, जिवे मारण्याची धमकी असे गुन्हे दाखल होते.

शरद मोहोळ कोण आहे?

शरद मोहोळ याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण असे अनेक गुन्हे नोंद आहेत. विरोधी टोळीतील पिंटू मारणे याच्या हत्येप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. या खटल्यात तो जामिनावर बाहेर आला आणि दासवे गावचे सरपंच शंकर धिंडले यांचे त्याने अपहरण केले. त्यामुळे त्याला पुन्हा अटक करण्यात आली.

या कालावधीत येरवडा कारागृहात त्याने आणि विवेक भालेराव या दोघांनी मिळून दशतवादी कृत्यांमध्ये सहभागी असल्याचा आरोप असलेल्या कतील सिद्दीकीचा खून केला.

या प्रकरणात मागील वर्षी शरद मोहोळला जामीन मिळाला. मात्र, बाहेर आल्यानंतर त्यानं पुन्हा गुन्हेगारी कृत्य सुरु केलं. खंडणीसाठी धमकावल्याबद्दल त्याच्यावर पुण्यातील खडकमाळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाकडून त्याच्याविरुद्ध तक्रार देण्यात आली आणि पुणे पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला.

मात्र स्वतः गुन्हेगारी विश्वात असलेल्या शरद मोहोळने स्वतःच्या पत्नीच्या मार्फत राजकारणात उतरायचे ठरवले आहे. शरद मोहोळ आणि त्याच्या टोळीचे कार्यक्षेत्र कोथरूड परिसरात आहे. जुलै २०२२ मध्ये त्याला पुणे जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले होते.

शरद मोहोळ हा संशयित दहशतवादी कातिक सिद्दीकीच्या हत्या प्रकरणातील आरोपी आहे. जर्मन बेकरी स्फोटाच्या वेळेस दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराजवळ बॉम्ब ठेवण्याचा प्रयत्न करणारा संशयित दहशतवादी कातिल सिद्दीकीलाअंडासेलमध्ये गळा आवळून फास दिल्याचा आरोप होता. मात्र, पुराव्याअभावी शरद मोहोळ याची निर्दोष मुक्तता केली.

याबाबत पलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०११ मध्ये पौड येथील एका उद्योजकाच्या अपहरणाबाबत दाखल गुन्ह्यात खंडणी विरोधी पथक (पुणे) आणि पौड पोलिसांनी शरद मोहोळ व इतरांवर अपहरण करणे, मारहाण करणे, खंडणी मागणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.

रम्यान, त्यावेळच्या काही पोलिसांनी जबरदस्ती गुन्हा दाखल करण्यास भाग पाडल्याचे न्यायालयात शपथेवर सांगण्यात आले. तसेच तब्बल तेरा वर्षांनंतर एकाही साक्षीदाराने सरकार पक्षाच्या बाजूने साक्ष दिली नाही.

त्याचप्रमाणे शरद मोहोळ व इतरांकडून गुन्ह्यात कोणत्याही प्रकारची मालमत्तेची जप्ती सिद्ध होऊ शकली नाही. या सर्व बाबी विचारात घेऊन न्यायालयाने शरद मोहोळ याच्यासह इतर सात जणांची निर्दोष मुक्तता केली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!