पुणेकरांनो वॉटर पार्कला जाताय? काळजी घ्या, तरुणी कुटूंबासोबत गेली अन् भयंकर घडलं, क्षणात गेला जीव…


पुणे : पुणे – सातारा महामार्गावरील वरवे खुर्द गावच्या हद्दीतील राजगड वॉटर पार्कमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली. याठिकाणी वॉटर पार्कमध्ये एका तरुणीला आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. वॉटर पार्कमध्ये ‘झिपलायनिंग’ करताना ३० फूट उंचीवरून जमिनीवर पडून तरुणीचा मृत्यू झाला आहे.

यामुळे याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. साडेपाचच्या सुमारास तरल ही तरुणी झिपलायनिंग करण्यासाठी गेली. रोपवरून चालत जाताना सुरक्षा दोर वरच्या बाजूच्या रेलिंगला लावण्यासाठी तिचा हात पुरत नव्हता. त्यामुळे ती लोखंडी स्टूलवर उभी राहून दोर वरच्या बाजूला लावत होती. यावेळी धक्कादायक घटना घडली. यावेळी स्टूल हलला आणि तरल सुमारे ३० फूट खाली जमिनीवर कोसळली.

घटनेनंतर लगेच तिला तात्काळ नसरापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, यावेळी तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. राजगड पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून, पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तुकाराम राठोड तपास करत आहेत. यामुळे सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सध्या पुणे परिसरात वॉटर पार्कची संख्या वाढत असून याठिकाणी सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे याठिकाणी याकडे लक्ष देणे गरजेचे असून परवानगी देताना या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. अशा घटनेमध्ये वाढ होत आहे. यामुळे याला जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण होत आहे.

दरम्यान, सध्या मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या असून अनेक वॉटर पार्कमध्ये मोठी गर्दी होताना दिसते आहे. भोर, वेल्हे तालुक्यांत वॉटर पार्क, फार्म हाउसची संख्या वाढत असून, येथे पर्यटनासाठी येणाऱ्यांचीही संख्या सध्या वाढत आहे. छोट्या छोट्या फार्म हाऊस मध्ये देखील स्विमिंग पूल उपलब्ध आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!