पुण्यातील युवकाने नाण्यांचा वापर करुन बनवले अनोखे शिवलिंग, लागली २२ हजार ३०१ नाणी…!

पुणे : पुणे शहरातील युवकाने अनोखे शिवलिंग बनवले आहे. हे शिवलिंग चक्क नाण्यांचा वापर करुन तयार करण्यात आले आहे. याचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. या अनोख्या शिवलिंगची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.
या युवकाने बनवलेले शिवलिंग पाहण्यासाठी अनेक जण भेटी देत आहेत. देशभरात महाशिवरात्रीचा उत्सव साजरा होत असताना या शिवलिंगची चर्चा सर्वत्र सुरु आहे. अनेकांनी आपल्या फोनवर याचे फोटो ठेवले आहेत.
दीपक घोलप हा तरूण शिवभक्त आहे. तो नियमित शिवमंदिरात जातो. एकदा मंदिरात असताना त्याला नाण्यांपासून शिवलिंग बनवण्याची कल्पना आली. मग त्याने नाणी जमवणे सुरु केले.
त्याने तब्बल २२ हजार ३०१ नाण्यांचा वापर करुन त्याने शिवलिंग साकारले. यामुळे या तरुणाचे कौतुक केले जात आहे. सध्या हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Views:
[jp_post_view]