Pune : ललित पाटील प्रकरणी महिला पोलीस उपनिरीक्षकासह दोघेजण बडतर्फ..

(Pune) पुणे : अमली पदार्त तस्कर ललित पाटील प्रकरणी आता पर्यंत अनेक घडामोडी समोर येत आहे. या प्रकरणी आता पर्यंत अनेक जणांना अटक देखील करण्यात आली आहे. अशातच आता एक मोठी माहिती समोर आली आहे.

अमली पदार्त तस्कर ललित पाटील ससून रूग्णालयातून पसार झाल्याप्रकरणी कर्तव्यात हलगर्जी केल्याच्या ठपका ठेवून महिला पोलीस उपनिरीक्षकासह दोघांना पोलीस दलातून बडतर्फ करण्याचे आदेश देण्यात आले . हे आदेश बुधवारी (ता.३) रोजी देण्यात आले आहेत.
ललित पाटील प्रकरणात आतापर्यंत पुणे पोलीस दलातील चार पोलिसांना बडतर्फ करण्यात आले असून ,पोलीस उपनिरीक्षक मोहिनी डोंगरे, सहाय्यक फौजदार जनार्दन काळे यांनी बडतर्फ केले आहेत. यामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

तसेच २९ सप्टेंबर रोजी ससून रूग्णालयाच्या परिसरात मेफेड्रोन बाळगल्याप्रकरणी दोघांना गुन्हे शाखेने अटक केली होती. त्यांच्याकडून दोन कोटी १४ लाख रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले. ससून रूग्णालयातील कैदी उपचार कक्षात (वॉर्ड क्रमांक १६) उपचार घेणारा अमली पदार्थ तस्कर ललित पाटील मेफेड्रोन विक्रीत सामील असल्याचे उघडकीस आले होते. Pune

याप्रकरणी ललितसह तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास वाॅर्ड क्रमांक १६ मधून बंदोबस्त्यात असलेला ललित पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाला होता. त्यानंतर वाॅर्ड क्रमांक १६ मध्ये बंदोबस्तास असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली.
बंदोबस्तात हलगर्जी केल्याचा ठपका ठेवून दहा पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. ललितला पसार होण्यास मदत केल्याप्रकरणी पोलीस नाईक नाथाराम भारत काळे आणि पोलिस शिपाई अमित सुरेश जाधव यांना अटक करण्यात आली. Pune
दरम्यान, अटक केल्यानंतर पोलीस दलातून दोघांना बडतर्फ करण्याचे आदेश ही आले आहे. याप्रकरणात एकूण ११ जणांना निलंबित करण्यात आले आहे. त्यातील चौघांना बडतर्फ केल्याने इतरांचे धाबे दणाणले आहेत.