Pune Weather Update : ऊन पावसाच्या खेळाने पुणेकर हैराण, पुढील काळात कस असणार वातावरण? हवामान खात्याने दिली महत्वाची माहिती…


Pune Weather Update : राज्यात सध्या अनेक ठिकाणी जोरदार पावसासह वारे वाहत आहे. आता पुणे शहर आणि परिसरात मान्सूनपूर्व पावसाचा प्रभाव कमी झाला असला तरी उन्हाचा चटका पुन्हा एकदा वाढू लागला आहे. गेल्या तीन दिवसांपासून शहराच्या कमाल तापमानात सातत्याने वाढ होत असून ३७.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. यामुळे बदल दिसत आहेत.

सध्या ढग निरभ्र झाल्याने पुढील तीन दिवस कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. शनिवारी (११ मे) व रविवारी (१२) शहरात जोरदार पाऊस झाला. परिणामी, शहराचे कमाल तापमान – जे पूर्वी ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होते – ३१ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले. यामुळे पाऊस कमी झाला की पुन्हा गर्मी वाढणार आहे.

सध्या पुणे शहरवासियांना काहीसा दिलासा दिला होता, मात्र तापमानात पुन्हा एकदा वाढ झाली. लोहगाव येथे ३६ अंश सेल्सिअस, तर शिवाजीनगर येथे ३७.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. यामुळे यामध्ये पुन्हा अजून वाढ होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पुणे शहर व परिसरात गुरुवारी १६ मेला दुपारपर्यंत प्रामुख्याने आकाश निरभ्र होतं, ढगाळ वातावरण होतं. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार,शुक्रवारी ( १७ मे) आणि शनिवारी (१८ मे) पुण्यात कमाल तापमानात ३९ अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होईल, तर रविवारी तापमान ४० अंशसेल्सिअसपर्यंत पोहोचेल.

आता पुढील २४ तासात राज्यात विविध भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही भागात उष्णतेच्या लाटेला इशारा देण्यात आला आहे. यामध्ये रायगड, रत्नागिरीमुळे तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. यामुळे काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. Pune Weather Update

याशिवाय सिंधुदुर्गात जोरदार पावसाची शक्यता असून जिल्ह्याला अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, जळगाव, नाशिकमध्येही अवकाळी पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे.

तसेच कोल्हापूर, सांगली, सोलापूर अहमदनगर या जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पुणे, सातारा, नाशिक, जळगावमध्ये पावसाच्या रिमझिम सरी पाहायला मिळतील. काल कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळल्या होत्या. अनेक ठिकाणी वारे देखील होते.

मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाचा जोर पाहायला मिळाला. साताऱ्याच्या महाबळेश्वरमध्येही मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्यात. तर पंढरपुरातही विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. यामुळे येणाऱ्या काळात 2 दिवस पावसाचे असणार आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!