पुण्यात’ ड्राय डे ‘च उल्लंघन ; मटका किंगसह तिघांवर गुन्हा दाखल, लाखोंचा साठा जप्त


पुणे : पुणे शहरात गणेश चतुर्थीच्या दिवशी ‘ड्राय डे’ घोषित करण्यात आला होता. असे असताना देखील आदेशाचे उल्लंघन करत शहराच्या मध्यवर्ती भागात देशी- विदेशी दारूची विक्री सर्रासपणे सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी आता खडक पोलिसांनी तीन जणावर गुन्हा दाखल केला असून त्यांच्याकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गणेशोत्सवाला कालपासून म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी जल्लोषात सुरवात झाली. शहरात काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त देखील तैनात होता. इतकेच नाही तर पुणे शहरात २७ ऑगस्टला ड्राय डे घोषित करण्यात आला होता. अर्थात कोठेही दारू विक्रीस परवानगी नव्हती. असे असताना मध्यवर्ती परिसरात दारू विक्री होत असल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान पोलीस तैनात असताना हा प्रकार सुरु असताना खडक पोलिसांनी शाहू चौकातील रोनक बार येथे कारवाई केली आहे. ड्राय डेच्या दिवशी बारमध्ये दारू विक्री केली जात असल्याचे उघड झाले. या ठिकाणाहून विविध ब्रँडच्या देशी- विदेशी दारूच्या शेकडो बाटल्या, रोख रक्कम व मोबाईल फोन असा सुमारे १ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणात खडक पोलिसांनी वैभव विजय डोंगरे (रा. शाहू चौक, शुक्रवार पेठ), गुडुकुमार भोलाकुमार कुमार (रा. रोनक बार, शुक्रवार पेठ) व कुख्यात मटका किंग नंदू नाईक (रा. रोनक बार, शुक्रवार पेठ) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!