आता पुणे ते सोलापूर फक्त तीन तासात!! एक्सप्रेस गाड्यांचा वेग वाढवला, जाणून घ्या…

पुणे : पुणे आणि सोलापूरचा रेल्वे प्रवास आता अधिक वेगवान होणार आहे. या मार्गावरील ट्रॅक आणि इतर आवश्यक कामे पूर्ण झाल्यामुळे एक्सप्रेस गाड्यांचा वेग वाढवण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे प्रवासी संख्या वाढणार आहे. याबाबत मागणी केली जात होती.
आता सोलापूरहून पुण्याला येणाऱ्या प्रवाशांना तीन ते सव्वातीन तासांमध्ये पुण्यात पोहोचता येणार आहे. यामुळे रेल्वे प्रवासात 35 ते 40 मिनिटांची बचत होईल. यामुळे येणाऱ्या काळात याबाबत वेळेची बचत होणार असल्याने अनेकजण रेल्वेने प्रवास करतील. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सध्या अनेक एक्सप्रेस गाड्यांचा वेग 130 किमी प्रतितास पर्यंत वाढवण्यात आलेला आहे. पूर्वी हा वेग 110 पर्यंतच होता. याबाबत पुणे-दौंड-सोलापूर सेक्शनमध्ये गाड्यांचा वेग वाढवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पायाभूत सुविधांच्या सुधारणेचे काम सुरू केले आहे.
अनेक कामे सुरू असून अनेक कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. यामध्ये ट्रॅक सुधारणा, ओव्हरहेड इक्विपमेंट रेग्युलेशन, सिग्नलिंग आणि इतर तांत्रिक कामांचा समावेश आहे. येणाऱ्या काळात देखील कामे पूर्ण झाल्यावर गाड्याचा वेग वाढणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, या कामांमुळे दौंड-सोलापूर-वाडी सेक्शनवर (341.80 किमी) धावणाऱ्या गाड्यांचा वेग 110 किमी प्रतितास वरून 130 किमी प्रतितास पर्यंत वाढवला गेला आहे. यामुळे आता अनेक गाड्या लवकरच पुणे आणि सोलापूरला पोहचतील. यामुळे संख्या वाढणार आहे.