Pune Solapur Demu : प्रवाशांना मोठा दिलासा! आता पुणे-सोलापूर डेमू मांजरी स्थानकावर थांबणार..


Pune Solapur Demu पुणे : रेल्वे प्रशासनाने पुणे-सोलापूर डेमूला मांजरी स्थानकावर थांबा मंजूर केला आहे. मध्य रेल्वे वापरकर्ता सल्लागार समितीची नुकतीच मुंबईत बैठक झाली. याबैठकीत झालेल्या चर्चेची माहिती समितीचे सदस्य अ‍ॅड. कृपाल पलूसकर यांनी दिली आहे.

तसेच दौंड हे पुणे शहराचे उपनगर म्हणून कार्यान्वित करावे तसेच हडपसर स्थानकातील हैदराबाद एक्सप्रेसचा थांबा तीन ऐवजी एक नंबर प्लॅटफॉर्मवर आणावा यासह केलेल्या अनेक मागण्यांना रेल्वे प्रशासनाकडून हिरवा कंदील देण्यात आला आहे. Pune Solapur Demu

अ‍ॅड. कृपाल पलूसकर म्हणाले, सध्या पुणे-सोलापुर डेमूला मांजरी स्थानकावर थांबा नाही. तीला थांबा मिळावा, दौंड-पुणे आणि पुणे-सातारा लोकलची वारंवारिता कमी असल्याने विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार, व्यावसायिक यांची गैरसोय होत आहे. या मार्गावरील गाड्यांची वारंवारिता वाढवण्यात यावी.

तसेच हडपसर स्थानकात हैदराबाद एक्सप्रेस गाडीचा प्लॅटफॉर्म क्रमांक तीन आहे. मात्र तो गर्भवती महिला, दिव्यांग, वयोवृद्ध ज्येष्ठ प्रवाशांना हा प्लॅटफॉर्म सोयीस्कर नाही. त्यामुळे हा थांबा प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर द्यावा.

याशिवाय दौंड हे पुण्याचे उपनगर म्हणून कार्यान्वीत करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात आली होती. यासंदर्भात रेल्वे प्रशासनाला सूचना देण्यात आल्या होत्या. रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश ललवानी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत या सर्व मागण्यांना हिरवा कंदील देण्यात आला असल्याचे अ‍ॅड. पलूसकर यांनी सांगितले.

त्यामुळे पुणे-सोलापूर डेमू मांजरी स्थानकावर थांबणार असून येत्या तीन ते चार महिन्यात हा थांबा कार्यान्वीत होणार आहे. तसेच हडपसर स्थानकाचा अमृत भारत स्टेशन अंतर्गत सकारात्मक विचार व परीक्षण करुन निर्णय घेतला आहे.

दरम्यान, येत्या काही महिन्यात दुहेरी मार्ग झाल्यानंतर लोकलची वारंवारता वाढवण्याचा निर्णय घेण्यात येईल. तर दौंड पुणे शहराचे उपनगर म्हणून कार्यान्वित करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली असून लवकरच त्याची अंमलबजावणी होणार असल्याचे अ‍ॅड. पलूसकर यांनी सांगितले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!