Pune Rain : पुणेकरांना दिलासा! उन्हाच्या तडाख्यात पावसाने लावली हजेरी, बरसला धो-धो…


Pune Rain : पावसाने पुण्यातील अनेक भागात सध्या जोरदार हजेरी लावली आहे. राज्यातील अनेक भागात पूर्वमौसमी पाऊस बरसणार, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता.

या पावसामुळे पुण्यातील उकाड्यापासून थोडासा दिलासा मिळाला आहे. मात्र, पुण्यात आज लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक राजकीय पक्षांनी सभांचे आयोजन केले होते, या सभांना पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, पावसामुळे या सभा होतील का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. Pune Rain

पुण्यात आज (ता.१०) सकाळपासून ढगाळ वातावरण होते. त्यानंतर गेल्या तासाभरापासून पुण्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. जोरदार पावसामुळे स्वारगेट परिसरातील रस्त्यांवर पाणी वाहू लागले आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून लोकांना उकाडा जाणवत होता.

ऊनामुळे नागरिक चांगलेच हैराण झाले होते. मात्र, आजच्या पावसामुळे पुण्यातील वातावरणात गारवा निर्माण झालाय. पुण्यातील लोक पावसाचा आनंद घेताना दिसत आहेत.

मात्र, राजकीय पक्षांना याचा फटका बसलाय. कोंढवा परिसरात अजित पवारांची सभा होणार आहे. मात्र,पावसामुळे सभा पार पडणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!