Pune Police MCOCA Action : लोणीकाळभोर पोलिस ठाणाच्या हद्दीत खंडणी मागणाऱ्या सनी शेवाळे याच्यासह साथीदारांवर मोक्का अंतर्गत कारवाई; आयुक्त रितेश कुमार यांची 66 वी संघटीत मोक्का कारवाई..!!


Pune Police MCOCA Action  पुणे : तलवारीचा धाक दाखवून खंडणी मागणाऱ्या तसेच लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत पसरवणाऱ्या सनी उर्फ मृणाल शेवाळे व त्याच्या २ साथीदारांवर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आतापर्यंत ६६ संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे. (Pune Police MCOCA Action)

पोलिसांनी दाखल गुन्ह्याचा तपास करुन टोळी प्रमुख सनी उर्फ मृणाल मोहन शेवाळे (वय. २६ रा. उरळी देवाची, ता. हवेली), टोळी सदस्य प्रसाद बापुसाहेब भाडळे (वय. २३ रा. उरळी देवाची), समीर बाबुलाल जमादार (वय. २३ रा. मंतरवाडी, उरळी देवाची) यांना अटक केली आहे.

फिर्यादी हे उरळी देवाची गावाच्या स्मशानभूमीजवळ असलेल्या ओढ्याजवळ पाईपलाईन दुरुस्त करत होते. त्यावेळी सनी उर्फ मृणाल मोहन शेवाळे याने फिर्यादी यांना तलवारीचा धाक दाखवून दुरुस्तीचे काम सुरु ठेवण्यासाठी ५० हजार रुपयांची खंडणी मागितली.

तसेच त्याच्यासोबत असलेल्या प्रसाद भाडळे याने फिर्यादी यांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. सनी शेवाळे यांने ५० हजार रुपये दिले नाही तर जिवे ठार मारण्याची धमकी फिर्यादी यांना दिली.

हतातील तलवार हवेत फिरवून आम्ही इथले भाई आहोत कुणी मध्ये आले तर जिवंत सोडणार नाही असे बोलून परिसरात दहशत निर्माण केली. हा प्रकार २६ ऑगस्ट रोजी दुपारी एकच्या सुमारास घडला होता. याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आयपीसी, आर्म ॲक्ट, क्रिमीनल लॉ ॲमेंटमेंट ॲक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी सनी उर्फ मृणाल मोहन शेवाळे याने संघटित गुन्हेगारी टोळी तयार करुन स्वत:च्या व टोळीच्या आर्थिक फायद्यासाठी गुन्हे केले आहेत. आरोपींनी मागील १० वर्षात खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर जमाव जमवून मालमत्तेचे नुकसान करणे, घातक हत्यारांनी दुखापत करणे, बेकायदा हत्यार बाळगणे, प्राणघातक हल्ला करणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यांनी अशा प्रकारचे गुन्हे वारंवार केले आहेत.

लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी परिमंडळ- ५ पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा यांना सादर केला होता. या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!