Pune : वाढत्या गुन्हेगारीवर पुणे पोलिसांचा गुंडांना जबर हिसका! गुंड विठ्ठल शेलारची गुन्हे शाखेने त्याच्याच भागात काढली धिंड…
Pune : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची भररस्त्यातच झालेल्या हत्येने खळबळ उडाली होती. शरद मोहोळच्या हत्येने अख्खं पुणे हादरले होतं. गँगस्टर शरद मोहोळ खूनप्रकरणात अटक करण्यात आलेल्या गुंड विठ्ठल शेलारची पोलिसांनी त्याच्याच भागात धिंड काढली आहे.
त्याची ही धिंड गुन्हेगारीतील ‘मुळशी पॅटर्न’ला पुणे पोलिसांचा जबर हिसका म्हणावं लागणार आहे. गँगस्टर शरद मोहोळ खून प्रकरणात गुंड विठ्ठल शेलारसह सहा जणांना नवी मुंबईतून ताब्यात घेतलं होतं. आतापर्यंत शरद मोहोळ खून प्रकरणात १४ जणांना अटक करण्यात आली आहे.
तसेच ५ जानेवारी रोजी पुण्यातील कोथरुड येथील सुतारदारा येथे गँगस्टर शरद मोहोळ याच्यावर त्याचे साथीदार मुन्ना पोळेकर आणि नामदेव कानगुडे यांनी गोळ्या झाडून खून केला होता. त्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या या आरोपींना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं पाठलाग करुन अटक केली होती.
मोहोळ याच्यावर पुण्यातील कोथरुड परिसरात भरदिवसा गोळीबार करण्यात आला होता. शरद मोहोळ कोथरुडमधील सुतारदरा या ठिकाणी जात असताना त्याच्याच साथिदारांनी त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या होत्या. त्यातील एक गोळी शरद मोहोळ त्याच्या खांद्याला लागली होती. Pune
यात तो गंभीर जखमी झाला होता. गंभीर जखमी झालेल्या शरद मोहोळला कोथरुडमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. यानंतर पोलिसांनी या घटनेचा कसून तपास करत आतापर्यंत १४ जणांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ खून प्रकरणात पोलिसांनी गुंड विठ्ठल शेलार याला अटक केली आहे. मात्र विठ्ठल शेलार याची पुणे पोलिसांनी त्याच्याच पिरसरात धिंड काढली आहे. यामुळे एकच चर्चा रंगली आहे.