Pune News : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! ‘या’ भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद, जाणून घ्या..


Pune News पुणे : पुणेकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. पुणे महापालिकेतर्फे येत्या गुरुवारी (ता. २६) वारजे जलशुद्धीकरण केंद्राअंतर्गत जलवाहिन्यांसह अन्य कामे केली जाणार आहेत. बहुतांश शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे महापालिकेने कळविले आहे. शुक्रवारी (ता.२७) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती आहे. Pune News

वारजे जलशुद्धीकरण केंद्र, चतुःशृंगी टाकी, पुणे कॅन्टोन्मेंट जलशुद्धीकरण केंद्र येथे देखभाल दुरुस्तीची कामे होणार आहेत. त्यामुळे तळजाई विभागातही पाणीपुरवठा बंद राहणार आहे. कोथरूड, कर्वेनगर, वारजे, शिवणे, भुसारी कॉलनी, शिवतीर्थनगर, सेनापती बापट रस्ता, मॉडेल कॉलनी, डेक्कन, पुलाची वाडी.

रामबाग कॉलनी, मोरे विद्यालय, हनुमाननगर, केळेवाडी, एमआयटी कॉलेज रस्ता डावी व उजवी; तसेच कॉलेजमागील बाजू, एलआयसी कॉलनी, माधवबाग, जयभवानीनगर, राजा शिवराय प्रतिष्ठान शाळा, शिवतीर्थनगर, किष्किंधानगर, पेठकर साम्राज्य, कांचनबन, लीलापार्क, सुतारदरा, म्हातोबानगर, आझादनगर, वनाझ कंपनी संपूर्ण परिसर, वृंदावन, गाढवे कॉलनी, वडारवस्ती, श्रमिक वसाहत, स्टेट बँक कॉलनी, वनदेवी परिसर, मावळे आळी, सरगम सोसायटी.

शिवाजीनगरचा परिसर, औंध, बाणेर, नगर रस्ता, खराडी गावठाण, चंदननगर, हडपसर, मुंढवा, महंमदवाडी, ससाणेनगर, काळेपडळ, येरवडा, बिबवेवाडी, बालाजीनगर, इंदिरानगर, तळजाई परिसर, कात्रजचा काही भाग आदींचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे महापालिकेने कळविले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!