Pune News : कॉलेजच्या वसतिगृहातच इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या, पुण्यातील धक्कादायक घटना..
Pune News : पुण्यात एका इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. येवलेवाडी येथील सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या वसतिगृहात तरूणाने गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
ही घटना मंगळवारी (ता.२१) सायंकाळी येवलेवाडी येथील सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या वसतिगृहात घडली आहे.
अभिषेक प्रवीण शेळके (वय, २२, रा. शिर्डी, नगर) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, अभिषेक हा मूळचा शिर्डी येथील असून पुण्यात शिक्षणासाठी आला होता. इंजिनिअरिंगच्या तिसर्या वर्षाला तो शिकत होता. मंगळवारी तो वसतिगृहातील रूममध्ये एकटाच होता. सांयकाळी त्याचे रूममेट पेपर देवून वसतिगृहात आले. त्यांनी दरवाजा वाजविल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. Pune News
घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अभिषेकच्या आत्महतेचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मात्र, त्याला इंजिनिअरिंगचे पेपर अवघड गेले होते. तसेच, त्याचे काही विषय बॅकलॉगला देखील असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यातूनच त्याने हे पाऊल उचलल्याची शक्यता आहे.
दरम्यान, याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.