Pune News : लाच स्वीकारताना ससून रुग्णालयात कर्मचारी अडकला, एसीबीची कारवाई..


Pune News : पुणे एसीबीने एक मोठी कारावाई केल्याची माहिती समोर आली आहे. वैद्यकीय बिल मंजूर करण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच घेताना ससून रुग्णालयामधील एका कर्मचाऱ्याला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहात पकडले.

जालिंदर चंद्रकांत कुंभार (वय.५५, पद -उदवाहक, उपअधीक्षक कार्यालय, ससून हॉस्पिटल, पुणे) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याबाबत ५७ वर्षीय व्यक्तीने पुणे एसीबी कार्यालयात तक्रार केली आहे.

कुंभार हा ससून रुग्णालयातील उपअधीक्षक कार्यालयात चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी आहे. ही कारावाई पुणे एसीबीने बुधवारी (ता.२७) ससून हॉस्पिटलच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ केली.

मिळालेल्या माहिती नुसार, तक्रारदाराने ससून रुग्णालयात एक लाख ४३ हजार रुपयांचे वैद्यकीय बिल मंजूर करण्यासाठी १ जून २०२३ रोजी अर्ज दिला होता. या बिलाच्या मंजुरीसाठी उपअधीक्षक कार्यालयात काम करणारे जालिंदर कुंभार यांनी वैद्यकीय बिलाचे दोन टक्के रक्कम प्रमाणे तीन हजार रुपये लाच मागितली.

याबाबत तक्रारदार यांनी २९ नोव्हेंबर रोजी पुणे एसीबी कार्यालयात येऊन तक्रार दिली होती. एसीबीच्या पथकाने केलेल्या पडताळणी दरम्यान वैद्यकीय बिल मंजूर कारणासाठी जालिंदर कुंभार यांनी पंचांसमक्ष तीन हजार रुपयांची लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

पथकाने बुधवारी ससून हॉस्पिटलच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सापळा रचला. तक्रारदार ह्यांच्याकडून लाचेची रक्कम स्विकारल्यावर त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. कुंभार यांच्यावर बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!