Pune News : पुण्यातील येरवडा पुन्हा एकदा हादरले, भर दिवसा करण्यात आला कैद्याचा खून, उडाली खळबळ..
Pune News : पुण्यातील येरवडा कारागृहात कैद्याचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. हत्येच्या या घटनेमुळे येरवडा कारागृह पुन्हा एकदा हादरले आहे. ही घटना गुरुवार (ता.२८) रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
महेश महादेव चंदनशिवे असे हत्या झालेल्या आरोपीचे नाव आहे. अनिकेत समदूर, महेश तुकाराम माने, गणेश हनुमंत मोटे आणि आदित्य संभाजी मुरे अशी या संशयित आरोपींची नावे आहेत.
पूर्व वैमान्यासातून ४ कैद्यांकडून महेशची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. चारही आरोपींच्या विरोधात पुण्यातील येरवडा पोलीस स्थानकात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कैचीने आणि धारदार हत्याराने मानेवर वार करत महेशची हत्या करण्यात आली. या घटनेने पुन्हा एकदा पुणे हादरले आहे. Pune News
खून, खुनाचा प्रयत्न, तोडफोड करणे, दुखापत करणे, घातक शस्त्र, अग्नीशस्त्र बाळगणे, दरोड्याची तयारी करणे, दराेडा घालणे, चोरी अशा आरोपांखाली महेश हा येरवडा कारागृहात होता.
दरम्यान, इतर चौघे संशयित देखील विविध गुन्ह्यांमध्ये कारागृहात होते. पण पूर्ववैमानस्य मनात ठेवून या चौघांनी कारागृहात महेशची हत्या केली.