Pune News : पुण्यात मनसेचा पदाधिकारी अडकला, कंत्राटदाराला मागितले पैसे, खंडणीचा गुन्हा दाखल..

Pune News : महानगरपालिकेच्या कंत्राटदाराला जातीवाचक शिवीगाळ करत खंडणीची मागणी केल्याप्रकरणी पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वारगेट पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
प्रल्हाद गवळी असे गुन्हा दाखल झालेल्या मनसे पदाधिकाऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रल्हाद गवळी याने तक्रारदार विजय कांबळे यांना जातीवाचक शिवीगाळ केली. इतकंच नाही, तर खंडणीची देखील मागणी केली. याप्रकरणी तक्रारदाराने पोलिसांत धाव घेत फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीनुसार, स्वारगेट पोलिसांनी गवळी याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. Pune News
प्रल्हाद गवळी हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पुण्यातील निकटवर्तीय मानला जातो. गवळीच्या अनेक उपक्रमांमध्ये राज ठाकरे पुण्यात नेहमी हजेरी लावत असतात. त्याच्यावर पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, पुण्यात मनसे पदाधिकाऱ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल होण्याची आठवडाभरातील ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी शिरूर येथील मनसेचा जनहित कक्ष जिल्हाध्यक्ष असलेल्या सुशांत कुटे याच्यावर खंडणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. कपिल धनिलाल यादव यांच्या पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला होता.