Pune News : ससूनमधील ड्रग्स माफिया ललित पाटीलबाबत मोठी माहिती आली समोर, तपासला मिळणार गती..


Pune News पुणे : ससून रुग्णालयात उपचार घेत असलेला आरोपी ललित अनिल पाटील (वय ३४) याने पोलिसांना चकवा देऊन पलायन केले होते. ही घटना सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. ललित पाटील याचा अद्याप शोध लागलेला नाही. Pune News

त्याचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहे. पोलिसांकडून ससून हॉस्पिटल परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत.

तसेच येरवडा कारगृहातून ससूनमध्ये उपचारासाठी दाखल झालेला ललित पाटील फेरफटका मारण्याच्या नावाखाली रुग्णालयातून बाहेर जात होता. पुणे स्टेशन परिसरातील पंचतारांकीत हॉटेलमध्ये तो मुक्कामही करायचा अशी खळबळजनक माहिती तपासात समोर आली आहे.

ललित पाटील याला दोन कोटी रुपयांचे मेफेड्रोन देण्यासाठी आलेला साथीदार सुभाष मंडल याला गेल्या शनिवारी (ता. ३०) रुग्णालय परिसरातून गुन्हे शाखेने पकडले. तसेच हॉस्पिटलच्या कॅनिटमध्ये काम करणाऱ्या रौफ शेख याच्यामार्फत मंडल हा पाटील याला अंमली पदार्थ देणार होता.

ललित पाटील रुग्णालयातून अंमली पदार्थाचे रॅकेट चालवत असल्याचे तपासात समोर आले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ललित पाटील पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाला. या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी नऊ पोलिसांना तडकाफडकी निलंबित करण्याचे आदेश दिले.

ललित पाटील ससून रुग्णालयातून पसार झाल्यानंतर कोणत्या दिशेने गेला, त्यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी पुणे स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली. पसार झाल्यानंतर पाटील स्टेशन परिसरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गेला होता.

दरम्यान, या हॉटेलमध्ये त्याच्या नावावर एक खोली आरक्षित करण्यात आली होती. पाटील नेहमीप्रमाणे बाहेर फेरफटका मारण्यासाठी गेला असावा, असे बंदोबस्तावरील पोलिसांना वाटले. मात्र ललित पाटील पुन्हा हॉस्पिटलमध्ये परतलाच नाही तो पसार झाला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!