Pune News : प्रेमी युगलाने संपवल आयुष्य, लॉजमध्ये गेले ओढणी घेतली अन्…; घटनेने उडाली खळबळ


Pune News : पुण्यातील वाघोली परिसरात एका प्रेमी युगुलाने एका लॉजमध्ये एकाच ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. Pune News

ही घटना सोमवारी (ता.३०) सायंकाळी सहा ते सातच्या दरम्यान उघडकीस आली आहे.या प्रेमीयुगलाने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही. Pune News

सचिन गोकुळ शिंदे (वय.२१ सध्या रा. खराडी, मुळ रा. नेहरु कॉलनी, भिंगार, अहमदनगर) आणि कोमल सुनील बर्के (वय.२० रा. चंदननगर, खराडी, पुणे) असे आत्महत्या केलेल्या प्रेमीयुगुलाचे नाव आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, सचिन आणि कोमल हे दोघे सकळी अकराच्या सुमारास लॉजमध्ये आले होते. सायंकाळी सहा वाजता खोली सोडणार होते.
मात्र, सहा वाजून गेल्यानंतरही त्यांनी खोली सोडली नाही. त्यामुळे लॉज मधील कर्मचाऱ्यांनी सचिनच्या मोबाईल फोनवर संपर्क साधला.

मात्र, त्याने फोन उचलला नाही. त्यामुळे हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगारांनी खोलीजवळ जाऊन बेल वाजवली. परंतु आतुन काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी खोलीचा दरवाजा ढकलला.

कामगारांनी दरवाजा उघडला असता सचिन आणि कोमल यांनी एकाच ओढणीने गळफास घेतल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांनी लोणीकंद पोलिसांना घटनेची माहिती दिली. दोघांनी आत्महत्या का केली, यामागचे कारण समजू शकले नाही. घटनास्थळी पोलिसांना चिठ्ठी (सुसाइड नोट) सापडली नाही.

कोमल ही डी-एमएलटी चे शिक्षण घेत होती. तर सचिन पुण्यातील एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुरज राजगुरु करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!