Pune News : लोणीकंद केसनंद रस्त्यावर टँकर पलटी झाल्याने गॅस गळती, थेऊरकडे जाणारी-येणारी वाहतूक सायंकाळपर्यंत राहणार बंद

Pune News पुणे : लोणीकंद – केसनंद रस्त्यावर गॅस कंपनीचा टँकर पलटी झाल्याने गॅस गळती होत असल्याची घटना लोणीकंद (ता.हवेली) येथील मगर वस्ती परिसरात घडली आहे. Pune News

ही घटना शनिवारी (ता.३०) पहाटे दोन च्या सुमारास घडली आहे. गॅस गळतीचे प्रमाण अत्यल्प असले तरी पोलिसांनी खबरदारी म्हणून या परिसरातील वाहतूक अन्यत्र वळवली आहे.
गॅस कंटेनर पडला असल्याने लोणीकंद येथून थेऊरकडे जाणारी व येणारी वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे. हि वाहतूक शनिवारी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत सुरु होईल. तोपर्यंत वाहतूक खराडी बायपास मार्गे वळविण्यात आलेली आहे.

या घटनेत कोणतीही दुर्घटना घडली नसल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांनी दिली आहे. तर थेऊरकडे जाणारी येणारी वाहतूक शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता.३०) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास गॅस घेऊन जाणारा टँकर अचानक पलटला. टँकर पलटी झाल्यानंतर गॅस गळती सुरू झाली आहे. गळतीचे प्रमाण कमी असले तरी काल मध्यरात्रीच अग्निशमन दल आणि भारत गॅस कंपनीच्या सुरक्षा व्यवस्थापकांना घटनास्थळी बोलावून घेण्यात आले आहे.
घटनास्थळ परिसरात उच्च दाबाच्या विद्युत वाहिनी जात असल्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून विद्युत प्रवाह बंद केला आहे. या भागातील रहिवाशांना खबरदारी म्हणून आवश्यकता सूचना करण्यात आल्या आहेत.
सध्या पलटी झालेल्या टँकरमधून दुसऱ्या टँकरमध्ये गॅस भरण्याचे काम सुरू आहे. सुमारे चार ते पाच तासांत ही प्रक्रिया पूर्ण होईल, असे वरिष्ठ निरीक्षक काईंगडे यांनी सांगितले आहे.