Pune News : टर्म लोन घेताय? सावधान! आमिष दाखवून महिलेची लाखांची फसवणूक, पुण्यातील घटना..


Pune News पुणे : टर्म लोन देण्याचे आमिष दाखवून पुण्यातील पद्मावती परिसरात राहणाऱ्या एका महिलेची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Pune News

राजश्री रविकुमार भिंगानिया (वय.५० रा. पद्मावती, पुणे) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 80935XXXXX मोबाईल धारक, इंडियन व फेडरल बँक खाते धारकांवर गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, फिर्य़ादी यांनी याप्रकरणी पुणे सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. सायबर पोलिसांनी हा गुन्हा सहकारनगर पोलिसांकडे वर्ग केला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. त्यांना टर्म लोन देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांच्या आर.बी.एल बँकेच्या क्रेडिट कार्ड खात्यावरुन १ लाख २४ हजार २८३ रुपये इंडियन बँक आणि फेडरल बँकेच्या खात्यावर ट्रान्सफर करुन घेतले.

दरम्यान, फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्य़ादी यांनी पुणे सायबर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे देशमाने करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!