Pune News : चर्चा पार्थ पवारांची अन् वर्णी दुसऱ्याच नेत्याची, पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदी ‘या’ नेत्याची झाली निवड…
Pune News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा बँक संचालक पदाचा राजीनामा देण्यात आला होता त्यानंतर पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा सुरु होती. आता पुणे जिल्हा बँक संचालक पदाचा निकाल जाहीर झाला आहे. पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदी रणजित तावरे यांची वर्णी लागली आहे.
पुणे जिल्हा बॅंकेच्या संचालक पदासाठी सुनेत्रा आणि पार्थ पवार उमेदवारी अर्ज भरणार नाही. अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानं संचालक पद रिक्त झाले होते. त्यांच्या जागेवर पार्थ किंवा सुनेत्रा पवार संचालक होणार असल्याची जोरदार चर्चा होती.
आता मात्र पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी रणजित तावरे यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. रणजित तावरे हे बाळासाहेब तावरे यांचे पुतणे आहेत. अजित पवार यांनी या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे.
Views:
[jp_post_view]