Pune News : हो मी दारू पितो, पप्पानीच मला गाडी दिली!! पुणे अपघाताप्रकरणी आरोपी मुलाची कबुली….


Pune News : पुण्यात प्रसिद्ध व्यावसायिकाच्या मुलानं दोन आयटी अभियंत्यांना आपल्या गाडीखाली चिरडले. व्यावसायिक अग्रवाल यांच्या मुलाला अटक केली. मात्र त्याला थोड्याच वेळात जामीन मिळाला.

अल्पवयीन मुलाने दारू पिऊन, गाडी चालवून दोघांना उडवल्याचे हे प्रकरण सध्या फक्त पुण्यातच नव्हे तर राज्यभरात गाजत असून अवघ्या काही तासांतच त्याला जामीन मिळाल्यानेही संताप व्यक्त होत आहे. त्यातच आता त्या मुलाने एक मोठी कबुली दिली असून त्यामुळे त्याचे वडील गोत्यात सापडले आहेत.

अल्पवयीन आरोपीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यात्या वडिलांनीच त्याला पार्टीसाठी परवानगी दिली होती. मी कार चालविण्याचे रीतसर प्रशिक्षण घेतलेले नाही, वाहन चालविण्याचा परवानाही नाही, तरी वडिलांनीच त्यांच्या मालकीची ग्रे रंगाची पोर्श कार माझ्याकडे दिली. Pune News

मित्रांसह हॉटेलमध्ये पार्टी करण्यास परवानगी दिली. मी मद्यप्राशन करतो हे वडिलांना माहिती आहे, असे पोलीस चौकशीत आरोपीने पोलिसांना सांगितल असून यामुळे एकच खळबळ माजली आहे.

दरम्यान, शनिवारी मध्यरात्री झालेल्या या अपघातात अनिस अवधिया, अश्विनी कोस्टा हे दोघे मृत्युमुखी पडले. ते दोघेही राजस्थान येथील रहिवासी होते. या प्रकरणी विशाल अग्रवाल यांच्यासह अल्पवयीन मुलाला बार, पबमध्ये प्रवेश देणाऱ्या हॉटेल कोझीचे मालक प्रल्हाद भुतडा, व्यवस्थापक सचिन काटकर, हॉटेल ब्लॅकचे मालक संदीप सांगळे, बार व्यवस्थापक जयेश बोनकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!