Pune News : पुण्यात ढगाळ वातावरण, पुढील तीन दिवस पावसाची शक्यता, वादळी पाऊस असल्याचे काळजी घेण्याचे आवाहन…

Pune News : मागील दोन दिवस अवकाळी पावसाने राज्यातील बहुतांश भागात हजेरी लावत शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले. यापुढील पाच दिवस देखील काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुणे व आसपासच्या परिसरात आज (ता. २८) व उद्या (ता.२९) मेघगर्जनेसह, विजांच्या कडकडात हलक्या व मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर १ डिसेंबर पर्यंत आकाश ढगाळ राहणार आहे. Pune News
या कालावधीत पुण्याचे किमान तापमान सरासरी १८ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान हे 33 अंश सेल्सिअसच्या आसपास असणार आहे. यामध्ये मागील २४ तासात पुणे जिल्ह्याच्या निमगिरी येथे सर्वाधीक म्हणजे ६७ मीमि पावसाची नोंद झाली आहे.,शहर परिसरात ही साय़ंकाळी सुरु झालेला पाऊस उघड-झाप करत पहाटे पर्यंत सुरु होता.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार काल बालेवाडी ५० मिमी, खेड ३४.५मिमी, एनडीए १७.५ मिमी, हडपसर १६.७ मिमी, तळेगाव ढमढेरे 16.5 मिमी, चिंचवड १२ मिमी, लवळे ८ मिमी,हवेली ६.५, पाषाण ६.५,शिवाजीनगर ५.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान, पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी त्यानुसार काळजी घ्यावी असे आवाहन हवामान खात्याने सांगितले आहे.