Pune News : सुसंस्कृत पुण्यात पोलीसच असुरक्षित? कार अडवल्याचा राग, थेट पोलिसांना मारहाण करत दिली धमकी…


Pune News  : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भरधाव वेगाने येणारी कार थांबवण्यास सांगितल्याने थेट पोलिसांनाच मारहाण केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे.

गाडी अडवल्याच्या रागातून नोकरी कशी करतो ते बघतोच अशा शब्दात धमकीसुद्धा देण्यात आली. पुण्यातील सिंहगड रोडवर ही घटना घडली असून या प्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिंहगड रस्त्यावरील कोल्हेवाडी फाटा येथे दोन जणांनी ड्युटीवर असलेल्या पोलिसालाच मारहाण केली. याप्रकरणी मंगेश शिवाजी फडके व बापू रोहिदास दळवी यांच्या विरोधात हवेली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सविस्तर माहिती अशी की, , हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सिंहगड रस्ता परिसरातील कोल्हेवाडी शिवनगर रस्ता याठिकाणी वाहतूक कोंडी होते. दरम्यान रविवारी वाहतूक कोंडी हटविण्यासाठी पोलीस अंमलदार ऋषिकेश गायकवाड व आर. सी. फडतरे हे नेमणूकीस होते.

दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास एक कार भरधाव वेगाने येत असल्याचे पाहून पोलीस अंमलदार गायकवाड यांनी ती कार थांबवून रस्त्याच्या बाजूला घेण्यास सांगितले. त्यावेळी कारचालक मंगेश फडके याने अरेरावी सुरू केली व कार बाजूला घेण्यास नकार दिला.

मंगेश फडके हा कार तशीच रस्त्यावर उभी ठेऊन उतरला व “मी कोण आहे तुला माहित नाही. तू नोकरी कशी करतो तेच बघतो”असे म्हणत पोलीस अंमलदार ऋषिकेश गायकवाड यांना शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. Pune News

दुसरे पोलीस अंमलदार आर. सी. फडतरे हे गायकवाड यांच्या मदतीसाठी धावले. तेव्हा कारमध्ये बसलेला बापू रोहिदास दळवी हा कारमधून उतरला आणि त्यानेही पोलिसांना मारहाण केली. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!