Pune News : रस्त्यावरून चाललेल्या रिक्षावर झाड कोसळले, तिघे जखमी, कोथरूड येथील घटना..


Pune News  पुणे : पुण्यात कोथरूड परिसरातील पौड फाट्याजवळ रिक्षावर झाड कोसळून तीन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत तिघांनाही किरकोळ जखमा झाल्या. Pune News

या घटनेची माहिती कळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी त्यांना बाहेर काढत ससून रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. ही घटना शनिवारी सकाळी ९ वाजून १५ मिनीटांनी घडल्याची माहिती आहे. Pune News

मिळालेल्या माहितीनुसार, दशभुजा गणती मंदिराजवळील कॅनॉल रोडवरून एक रिक्षा (एमएच १२ एनडब्ल्यू ४४७५) जात होती. त्याचवेळी एक गुलमोहराचे झाड उन्मळून रिक्षावर पडले.

दरम्यान, त्याचवेळी एक दुचाकीस्वार देखील त्याच मार्गाने जात होता, मात्र सुदैवाने तो वाचला. झाड रिक्षावर पडल्याने त्यातील प्रवाशी रिक्षातच अडकले होते. कोथरूड येथील अग्निशमन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत, रिक्षात अडकलेल्या तिघांनाही बाहेर काढले.

त्यानंतर झाडाच्या फांद्या बाजूला करून रस्ता वाहतुकीस मोकळा करून दिला. यावेळी झाडामुळे थोडावेळ वाहतूक कोंडी झाली होती.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!