Pune News : पुण्यात मद्यधुंद वाहन चालकाने अनेक वाहनांना उडवले, एका पादचाऱ्याचा मृत्यू, गाड्यांचा केला भुगा…


Pune News पुणे : भरधाव जाणाऱ्या चारचाकी वाहनाने पाच ते सहा वाहनांना तसेच पादचाऱ्यांना उडवल्याची घटना शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता पुण्यातील प्रसिद्ध झेड ब्रिजजवळ घडली आहे. मद्यपान केलेल्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, पुणे येथील उमेश हनुमंत वाघमारे (वय.४८ ) आणि नटराज बाबुराव सूर्यवंशी (वय.४४) हे दोघे शुक्रवारी रात्री चार चाकी वाहनाने नारायण पेठ पोलीस चौककडून झेड ब्रिजकडे जात होते. दोघांनी मद्य प्राशन केले होते. Pune News

त्यातील उमेश वाघमारे गाडी चालवत होता. भरधाव वेगाने गाडी चालवत त्याने रस्त्यावरील वाहनांना धडक देणे सुरु केले. त्याचवेळी रस्त्याने जाणाऱ्या पदचाऱ्यांनाही धडक दिली. या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला तसेच चार जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!