Pune News : अबब! मटणाची ६१ लाखांची उदारी बुडवली, पुण्यात प्रसिद्ध हॉटेल चालकावर गुन्हा दाखल…

Pune News पुणे : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत. सध्या असाच एक प्रकार समोर आला आहे.
मटणाची उधारी न देता फसवणूक केल्याप्रकरणी लष्कर भागातील एका नामांकित हॉटेल मालकाविरुद्ध लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉटेल व्यावसायिकाने ६१ लाखांची उधारी न देता फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. Pune News
याप्रकणी मटण विक्रेत्याने (वय. ४३, रा. स्ट्रीट कॅम्प) लष्कर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी हॉटेलचालक अफझल युसूफ बागवान (वय ६५, रा. कोंढवा) आणि अहतेशाम अयाज बागवान (वय. ३५) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, लष्कर परिसरातील मटण मार्केटमधून या हॉटेलला दररोज मटण, चाप, खिमा, गुर्दा याचा पुरवठा केला जात होता. विक्रेत्याने या हॉटेलला २०१९ ते २०२३ या कालावधीत दोन कोटी ९१ लाख ८१ हजार रुपयांचा मटण पुरवठा केला.
हॉटेलचालकाने एकूण उधारीपैकी दोन कोटी ३० लाख १९ हजार रुपये परत केले. परंतु उर्वरित रक्कम ६१ लाख ६२ हजार रुपये देण्यास हॉटेलचालक टाळाटाळ करीत होता. त्यामुळे मटण विक्रेत्याने लष्कर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी हॉटेलचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.