पुणे- नाशिक हायस्पीड रेल्वेला मिळणार गती, अर्थसंकल्पात तरतूद…!
पुणे : शिंदे- फडणवीस सरकारने बजेटमध्ये पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेसाठी तरतूद केली आहे. यामुळे या कामाला गती मिळणार आहे. याचे रखडलेले काम यामुळे लवकरच मार्गी लागेल अशी आशा आहे. यामुळे येथील अर्थकारणाला गती मिळणार आहे.
हा मार्ग हवेली, खेड, आंबेगाव, संगमनेर, जुन्नर, सिन्नर, नाशिक तालुक्यातून जाणार आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी देखील कमी होण्याची शक्यता आहे. यामध्ये चाकण, मंचर, नारायणगाव, एलिफंटा, संगमनेरला प्रमुख स्थानके असणार आहेत.
दरम्यान, महाराष्ट्र रेल इन्फास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या वतीने ‘पुणे-नाशिक सेमी हायस्पीड’ प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पाला नुकतीच महाराष्ट्र शासनाने देखील मंजुरी दिली आहे. याचा शेतकऱ्यांना देखील फायदा होणार आहे.
दरम्यान, पुणे शहरातील 4 तालुक्यांमधून ही रेल्वे जाणार आहे. तसेच, 102 गावांमधून ही रेल्वे जात आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे हे गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न करत आहेत.