पुणे मेट्रोचा प्रवाशांसाठी मोठा निर्णय; गणेशोत्सवात सलग २० तास सुरू राहणार मेट्रो सेवा…


पुणे : पुण्यातील गणेशोत्सव जगप्रसिद्ध असून लाखो भाविक गणरायाच्या दर्शनासाठी पुण्यात येत असतात. दरम्यान भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन पुणे मेट्रोने मोठा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवात सलग २० तास मेट्रो सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

गणेशोत्सव काळात पुणे मेट्रोने प्रवासाच्या वेळेत वाढ केली असून, शनिवारी 30 ऑगस्टपासून ते 5 सप्टेंबरपर्यंत प्रवासाच्या वेळेत वाढ करण्यात आली आहे. या काळात सकाळी 6 ते रात्री 2 वाजेपर्यंत सलग 20 तास मेट्रो सेवा सुरू राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आणि गणेशभक्तांना दिलासा मिळणार आहे.गणेशोत्सवात चौथ्या दिवसानंतर आणि गौरी विसर्जनानंतर भाविकांची संख्या वाढते. या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून पुणे मेट्रोने जादा सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मेट्रोच्या वेळेत वाढ करण्यात आली आहे. 6 सप्टेंबर रोजी पुणे मेट्रोची सेवा तब्बल 41 तास म्हणजेच सकाळी 6 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी रात्री 11 वाजेपर्यंत अखंडपणे सुरू राहणार आहे.

प्रवाशांकडून पुणे मेट्रोला भरभरून प्रतिसाद मिळत असताना वाढती संख्या लक्षात घेऊन शिवाजीनगर ते स्वारगेट स्थानकांदरम्यान गरजेनुसार दर 3 मिनिटांनी मेट्रो धावेल, असे महामेट्रोचे संचालक यांनी सांगितले आहे. दरम्यान गणेशोत्सव काळात मेट्रोला गर्दी वाढत आहे. शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट मेट्रो स्थानकांच्या दरम्यान प्रवाशांची सर्वाधिक गर्दी होते. मंडई स्थानकावरून पहिल्याच दिवशी 43 हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे. आता गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!