पुणे मेट्रोत हनिमून पॅकेज सुरू करा! आनंदाच्या क्षणासाठी भाड्याने मिळणार असल्याने नेटकरी संतापले…!


पुणे : सध्या पुण्याच्या मेट्रोची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. याचे कारण म्हणजे पुणे मेट्रोने नुकतीच आपल्या वेबसाईटवर आणि सोशल मीडियावर आनंदाच्या क्षणासाठी मेट्रोचे पॅकेज दिले आहे. यामुळे यावर टीका केली जात आहे.

 

सोशल मीडियातून कॉमेंटचा पाऊस पडत आहे. मेट्रोला वेगवेगळे सल्ले दिले जात आहे. यामध्ये आनंदाचा क्षणच कशासाठी तर हानीमून पॅकेजही सुरु करा, असे म्हणत चांगलेच फटकारले आहे.

 

दरम्यान, आमच्या येथे बर्थडे पार्टीसाठी ट्रेन भाड्याने मिळेल, तसेच पापड, कुरडया आणि धान्य वाळवण्यासाठी स्टेशनची गच्ची भाड्याने मिळेल. असे म्हणत या ऑफरची थट्टा करण्यात आली आहे.

 

 

 

 

 

तसेच लग्नाचा मेट्रो थीम प्लान लवकरच उपलब्ध होणार, हनिमून पॅकेज लवकरच पुणेकरांच्या भेटीला येणार, दीपोत्सव, नवरात्री, दांडिया, ख्रिसमस वगैरसाठी ऑर्डर आताच बुक करा, अशा कॉमेंट केल्या आहेत. यामुळे सध्या याची चर्चा सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!