येत्या 15 दिवसात पुणे मेट्रोच्या स्थानकाची कामे पूर्ण होणार….!
पुणे : पुण्यात सध्या मेट्रोची कामे प्रगतीपथावर आहेत. आता वनाज ते रामवाडी मार्गावरील डेक्कन आणि छत्रपती संभाजी महाराज उद्यान मेट्रो स्थानकाचे काम प्रगतीपथावर असून, दोन आठवड्यांत या दोन्ही स्थानकांचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापक विनोद अग्रवाल यांनी दिली आहे.
सध्या गरवारे कॉलेज स्थानक ते रामवाडी स्थानक मार्गावरील कामे वेगाने सुरू आहे. 30 एप्रिल अखेर गरवारे कॉलेज स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानक या मार्गाचे काम पूर्ण करून सी. एम. आर. एस. इन्स्पेक्शन करण्यात येणार आहे.
यामध्ये छत्रपती संभाजी महाराज उद्यान, पुणे महानगरपालिका, सिव्हिल कोर्ट, मंगळवार पेठ, पुणे रेल्वे स्थानक आणि रुबी हॉल क्लिनिक ही महत्त्वाची स्थानके आहेत. ही कामे सध्या उरकणार आहेत.
काही स्थानके नदी पात्रात बांधण्यात येत आहेत. ऑगस्टपर्यंत या ठिकाणी पाणी असल्यामुळे काम सुरू करने शक्य नव्हते. पण, तरीही क्रेनच्या सहाय्याने काही कामे सुरू करण्यात आली होते. पण, खऱ्या अर्थाने नोव्हेंबरमध्ये छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्थानकाचे काम सुरू झाले होते.
हे काम 70 टक्के पूर्ण झाले असून उर्वरित काम 30 एप्रिलपर्यंत होईल. डेक्कन आणि छत्रपती संभाजी महाराज स्थानके लवकरच प्रवाशांसाठी खुली होणार आहेत.