पुणे बाजार समितीचे निकाल समोर, संतोष नांगरे मोठ्या मताधिक्याने विजयी


पुणे : राज्यातील बाजार समितीच्या निवडणुकीचे निकाल सध्या हाती येऊ लागले आहेत. आता पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत हमाल मापाडी मतदार संघाचा पहिला निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये संतोष नांगरे यांचा विजय झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

 

यामुळे एकच जल्लोष करण्यात आला आहे. नांगरे यांना सर्वाधिक ८८८ मते मिळाली आहेत. या मतदार संघातील अन्य पराभूत उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे : राजेंद्र चोरघे ४०३, गोरख मेंगडे ३१४, संजय उंद्रे ८, गोपाळ दसवडकर ३ मते मिळाली.

 

या मतदार संघात 1 जागेसाठी ५ उमेदवार रिंगणात होते. एकूण २ हजार ७ पैकी १ हजार ८०२ मतदान (८९.७९ %) झाले. त्यापैकी १ हजार ६१६ मते वैध ठरली. यामुळे कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

 

नांगरे यांचे शिट्टी चिन्ह होते. त्यामुळे हमाल-मापाडी मतदार संघात नांगरे यांच्या विजयाची शिट्टी वाजल्याने कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. अजूनही पुढील काही निकाल हाती येत आहेत. यामुळे अनेकांची धाकधूक वाढली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!