Pune : महाराष्ट्र राज्य महसूल सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची अशीही माणूसकी! संघटनेच्या वतीने निराधार मुलींना सव्वा लाखांची मदत..!

Pune पुणे : महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना, पुणे जिल्हा शाखा यांचेमार्फत सालाबादप्रमाणे रविवार (ता.७) रोजी पुणे जिल्हयातील सेवानिवृत्त महसूल अधिकारी व कर्मचारी यांचा स्नेहमेळावा, संत गाडगे महाराज, आकुल धर्मशाळा, सोमवार पेठ, पुणे येथे आयोजित करण्यात आला होता.

या स्नेहमेळाव्यास पुणे जिल्हयातील कोतवाल, शिपाई, वाहन चालक, तलाठी, लिपिक, मंडल अधिकारी, अव्वल कारकून, नायब तहसिलदार, तहसिलदार, उपजिल्हाधिकारी इत्यादी पदावरुन सेवानिवृत्त झालेले अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना, पुणे जिल्हा शाखेच्या सन २०२४ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन लक्ष्मीकांत पाचारणे, माजी राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना यांचे शुभहस्ते करण्यात आले. Pune

तसेच यावेळी आळणे (ता. उस्मानाबाद ) येथे मंतिमंद बेवारस मुलींची आश्रमशाळा चालविणारे शहाजी चव्हाण यांनी त्यांच्या मनोगतामध्ये संस्थेचा प्रवास सांगितला. या संस्थेत आज ११६ मुली संस्थेत रहात असून, त्यातील १०७ बेवारस मुलींची कथा म्हणजे एक कादंबरी होईल असे यावेळी ते म्हणाले. या मुलींच्या व्यथा जाणून घेताना उपस्थितांची मने हेलावून गेली.
दिपक चव्हाण, राज्य उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना यांनी सेवानिवृतांसमोर नतमस्तक होताना आपण व आपले सहकारी अशाच प्रकारच्या मेळाव्यांचे यापुढेही आपले सामाजिक भान जपत आयोजन करीत राहू अशीही ग्वाही दिली.
जिल्हाध्यक्ष श्रीनिवास कंडेपल्ली यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये आपल्या आधीच्या पिढीच्या सहकाऱ्यांचा एकमेकांना भेटल्याचा आनंद बघुन आपल्याला उर्जा मिळते अशी सद्भवना व्यक्त केली.
दरम्यान, सुरुवातीला विनायक राऊत यांनी उपस्थितांचे स्वागत करताना नववर्षाच्या व येणाऱ्या मकरसंक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. सचिन तांबोळी, जिल्हा सरचिटणीस यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुप्रसिद्ध निवेदक संजय पोमण यांनी केले आहे. या उत्कृष्ठ कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा संघटनेच्या सचिन तारु, मिलींद पोळ, विकास औताडे, प्रकाश धानेपकर, अंकुश आटोळे या पदाधिकाऱ्यांनी केले.
याप्रसंगी सुधीर तेलंग, निर्मला चौधरी, नामदेव शिंदे, शशिकांत नेवासकर, किशोर गंभीर, दत्तात्रय मेहता, रामभाऊ माने, गुरुनाथ थोडसरे सर, चंद्रशेखर जाधव, रामभाऊ भंडारी हे उपस्थित होते.