Pune Koyata Gang : पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ सुरुच, कँम्प परीसरात वाईन शॉपची तोडफोड, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण…

Pune Koyata Gang : पुण्यात अलीकडे गुन्हेगारीच्या घटनेत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या वेगात वाढले आहेत.
ड्रग्ज तस्करी, ससूनमधील गैरकारभार त्याचबरोबर शहरात भर दिवसा होणारे कोयते हल्ले यामुळे आता पुणेकर धास्तावले आहेत. सध्या देखील एका ताज्या घटनेने पुणे शहरात पुन्हा एकदा कोयता गॅंगची दहशत पाहायला मिळाली आहे.
पुण्यातील कॅम्प परिसरामध्ये कोयता गॅंगची दहशत पाहायला मिळाली आहे. कॅम्प परिसरात या गॅंगने वाईन शॉपची तोडफोड केली. चार ते पाच अज्ञातांनी वाईन शॉपची तोडफोड केल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे तेथील स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. Pune Koyata Gang
मागच्या अनेक दिवसापासून कोयता गॅंगने पुणे शहराच्या विविध भागांमध्ये धुडकूस घातलाय. पोलिसांनी ठोस पाऊले उचलून देखील यावर कोणताच परिणाम होत नसल्याचे दिसत आहे. या गॅंगने नुकतीच हडपसर फुरसुंगी परिसरातील अनेक दुकानांची तोडफोड केली.
रस्त्यावरील वाहनांच्या काचाही फोडल्या. यामधील सर्वात गंभीर बाब म्हणजे पोलिसांनी अटक केलेल्या ५ जणांपैकी ३ जण अल्पवयीन मुलं आहेत. या घटनेने नंतर पुन्हा एकदा नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.