Pune : पोलिसाला मारणे आमदारसाहेबांच्या आले अंगलट, पुण्यात भाजप आमदारावर गुन्हा दाखल…


Pune : पुण्यातील ससून रुग्णालयात तृतीयपंथीया करीता विशेष वॉर्ड तयार करण्यात आला आहे. या वॉर्डचे उदघाटन शुक्रवारी (ता.५) राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपाचे आमदार सुनील कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी आणि त्यानंतर पोलिस कर्मचाऱ्याला केलेल्या मारहाणीमुळे वाद निर्माण झाला.

याची चर्चा काल दिवसभर झाल्यानंतर बंडगार्डन पोलीस ठाण्यात भाजप आमदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुण्यातील या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर व प्रसारमाध्यमांमध्ये याच्या बातम्या झळकल्यानंतर विरोधकांनी यावर बोट ठेवले. Pune

राज्यभराची चर्चा झाली आणि मग आमदार सुनील कांबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. पुण्यातील ससून रुग्णालयाच्या बीजे वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यक्रमात ही घटना घडली.

उपमुख्यमंत्री अजित पवार देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर पोलीस कर्मचारी शिवाजी सरक हे स्टेजवरून उतरणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या ठिकाणी उभे होते.

दरम्यान, तेथे काही माहिती देत असतानाच सुनील कांबळे यांनी सरक त्यांच्या कानाखाली वाजवली. योगायोगाने हा व्हिडिओ चित्रित झाला. तो जर चित्रित झाला नसता तर? याची देखील चर्चा दिवसभर झाली.मात्र या सोशल मीडियात व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे सुनील कांबळे अडचणीत सापडले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!