Pune : हवेली बाजार समितीच्या मांजरी उपबाजारात मालविक्रीसाठी खोतेदाराकडून हप्ता! थेट अजित पवार यांच्याकडून तक्रारीची तात्काळ दखल..!!

Pune उरुळीकांचन : पुणे (हवेली ) बाजार समितीच्या मांजरी उपबाजारात खोतीदार विक्रेत्यांना बाजार समितीत माल विक्री करण्यासाठी काही संचालकांनी आपल्या हस्तकामार्फत हप्ते स्वरुपात पैसे गुगल पे वरुन उकाळल्याचा प्रकार घडला आहे. दरम्यान या खोतीदार विक्रेत्याने थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार दाखल केल्यानंतर या गंभीर प्रकाराची अजित पवार यांनी दखल घेऊन तातडीने बाजार समितीच्या घडलेल्या घटनेनेबाबत चौकशी करण्यासाठी विशेष कार्यकारी अधिकारी यांना पाठविल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान वसुली करणाऱ्या हस्तकाचा स्क्रिनशार्ट व्हायरल झाल्याने बाजार समितीच्या कारभाराची नाचक्की सुरू झाली आहे.
हवेली बाजार समितीच्या मांजरी उपबाजारात खोतीदार यांना माल विक्री करण्यास संचालक मंडळाने बंदी घातली आहे. एका संचालकाने हा विषय लावून धरुन शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला होता. हा रायतू बाजार असल्याने शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीसाठी बाजार उपलब्ध करून दिलेला आहे. अशावेळी गेली २० वर्षे बाजार समितीवर प्रशासक असल्याने या ठिकाणी खोतीदार बाजार आवारात माल विक्री करत होते. Pune
या बाजारात हवेली तालुक्यासह इंदापुर, बारामती, पुणे, पुरंदर, दौंड तालुक्यातील वरवंड, पाटस, खुटबाव, केडगाव, वाखारी, खोर, भांडगाव, खुटबाव, यवत, कासुर्डी, खामगाव, सहजपूर, नांदूर, बोरीऐंदी, डाळिंब, भरतगाव, ताम्हाणवाडीसह नगर रस्त्यावरील शेतकर्यांचा शेतमाल बाजारात विक्रीस येत आहे. अशावेळी माल विक्रीच्या नावाखाली काही संचालकांच्या हस्तकाने बाजार समितीत माल विक्री करण्याऱ्या खोतीदार यांच्याकडून हप्तेवसुली करण्यास सुरुवात केली आहे.
आता या हप्तेवसुलीचा पुरावा समोर आला असून तो थेट स्क्रीनशार्ट स्वरूपात व्हायरल झाला आहे. दरम्यान संबंधित प्रकाराची थेट तक्रार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे गेली असून खोतीदार यांनी अजित पवार यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. दरम्यान अजित पवार प्रकार यांनी घडलेल्या गंभीर प्रकाराची दखल घेतली आहे. त्यानुसार त्यांनी स्वतःच्या विशेष कार्यकारी अधिकारी यांना बाजार समितीत चौकशीस पाठविले आहे. दरम्यान अजित पवार यांच्या चौकशीत काय समोर येणार म्हणून चर्चा सुरू झाली आहे.