Pune : पुण्यात आलेल्या पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! चोरट्यांचा भाविकांच्या दागिन्यांवर डल्ला…


Pune : राज्यामध्ये सर्वत्र आषाढी वारीचा उत्साह दिसून येत आहे. संत तुकाराम महाराज आणि संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा रविवारी सायंकाळी पुण्यात दाखल झाला. पुणेकरांनी दोन्ही पालख्यांचे उत्साहात स्वागत केले.

पालखी सोहळ्यात दर्शनासाठी गेलेल्या महिलांचे दागिने चोरट्यांनी चोरून नेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. पालखी सोहळ्यात चोरट्यांनी भाविकांचे मोबाइल फोन चोरल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत.

विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुणे आळंदी रोडवरल मेंटल हॉस्पिटल कॉर्नर चौकात एक ४८ वर्षीय महिला संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन घेत होती. त्यावेळी चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या गळ्यातील ७५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसका मारुन चोरून नेले.

ही घटना रविवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास घडली. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक राठोड तपास करत आहेत.

दरम्यान, नाना पेठेतील श्री निवंडुग्या विठोबा मंदिर परिसरात श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी गेलेल्या ६३ वर्षीय ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील ५२ हजारांचे सोन्याचे गंठन चोरट्यांनी चोरल्याची घटना सोमवारी दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या दरम्यान घडली. याबाबत ज्येष्ठ महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने तपास करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!