Pune : मोठी बातमी! पुण्यात हेलिकॉप्टर कोसळले, गारवा हॉटेलजवळ घडली घटना…

Pune : पुण्यात एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील पौड भागात घोटोडे भागाच्या हद्दीत एका डोंगराजवळ हेलिकॉप्टरचा सांगाडा सापडला आहे. उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्याची माहिती आहे.

हेलिकॉप्टरमध्ये चार प्रवासी होते, त्यापैकी दोघे जण गंभीर जखमी आहे. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त हाती आले आहे. स्थानिकांनी अपघात स्थळी धाव घेत मदत केली आहे.
दरम्यान हेलिकॉप्टरमधील सर्व लोक सुखरूप असल्याची माहिती आहे. घटनास्थळी मदत व बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. मुंबईच्या ग्लोबल कंपनीचे हे हेलिकॅाप्टर आहे. तसेच मुंबईहून विजयवाडाकडे निघाले होते. Pune

खराब हवामान आणि मुसळधार पावसामुळे हेलिकॉप्टर कोसळले असावे असा प्राथमिक अंदाज आहे. हेलिकॉप्टरमधील ४ जण किरकोळ जखमी झाले असून त्यातील एक जण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचं वृत्त समजताच परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली. स्थानिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करत जखमींना रुग्णालयात पोहोचवण्यात मदत केली.
दरम्यान, प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील पौड भागात गारवा हॉटेलजवळ एक हेलिकॉप्टर अचानक आकाशात गिरक्या खाताना दिसले. त्यानंतर आवाज झाला आणि हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळले. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये चार प्रवासी होते. त्यापैकी दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. सध्या शंभरहून अधिक जण घटनास्थळी जमा झाले आहेत.