Pune : पुण्यात दहापैकी चौघांना बालदमा, भयंकर कारण आलं समोर, डॉक्टरांनी दिला मास्क वापरण्याचा सल्ला…


Pune पुणे : अवकाळी पडलेला पाऊस, त्यानंतर जाणवणारी थंडी आणि पहाटे शहरावर पसरणारे धुके अशा संमिश्र वातावरणामुळे श्वसनविकार झपाट्याने वाढत असल्याची माहिती आहे. तसेच लहान मुलांमध्ये खोकला आणि दमा यांसारखे आजार वाढल्याचे दिसून येत आहे.पुण्यात दररोज ओपीडीमध्ये येणाऱ्या १० रुग्णांपैकी ४ रुग्णांमध्ये बालदम्याचे निदान होत असल्याची माहिती तज्ज्ञ डॉक्टरांनी दिली आहे.

यामुळे लहान मुलांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच हिवाळा हा श्वसन विकाराच्या समस्यांना आमंत्रण देतो, तर या दिवसांत ॲलर्जीची लक्षणेही अधिक तीव्र होतात. या समस्या विशेषतः बालदमा असलेल्या मुलांमध्ये अधिक दिसून येतात. यामध्ये श्वासनलिकेवर सूज आल्यामुळे अथवा श्वासनलिकेमध्ये एक चिकट पदार्थ जास्त प्रमाणात स्रवल्यामुळे श्वासनलिकेचा मार्ग अरुंद होऊन श्वासोच्छवास प्रक्रियेत अडचणी येतात.

मुलांकडून श्वास बाहेर टाकताना छातीतून सतत शिट्टीसारखा आवाज येत असल्यास त्याला बालदमा असण्याची शक्यता सर्वाधिक असते. प्रदूषित वातावरण, तसेच गर्दीच्या ठिकाणी मुलांनी मास्कचा वापर करावा.

पेडियाट्रिक इंटेन्सिव्हिस्ट डॉ.विश्रृत जोशी म्हणाले की, सकाळच्या थंड वातावरणात धुक्याचे प्रमाण अधिक असते, अशा वेळी व्यायाम करणे टाळा. घराबाहेर पडताना उबदार कपडे घालायला विसरू नका. रूम हीटर वापरण्यापूर्वी तो स्वच्छ करावा. कारण वर्षभर न वापरल्यामुळे यामध्ये धूळ आणि बुरशीजन्य संसर्ग झाल्याची शक्यता असते. म्हणून तो वापरण्यापूर्वी त्याची साफसफाई आणि फिल्टर बदलणे गरजेचे आहे. Pune

इंटर्नल मेडिसिन एक्सपर्ट डॉ.सम्राट शहा म्हणाले यांनी माहिती दिली की, पुण्यातील बदलते वातावरण, वाढते प्रदूषण, श्वसन संसर्गाचे वाढते प्रमाण ही या समस्येमागची तीन प्रमुख कारणे आहेत. गेल्या काही दिवसांपासून व्हायरल ब्राँकायटीसचे प्रमाण वाढले आहे आणि त्यामुळेही १५-२० दिवस खोकला बरा होत नसल्याच्या तक्रारींनी बालरुग्ण ओपीडीमध्ये दाखल होत आहेत.

मुलांमध्ये घशासंबंधी विकार आढळताच, पालकांनी त्यांना मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करण्यास सांगावे, तसेच प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी त्यांना मैदानी खेळ खेळण्यास प्रोत्साहन द्यावे आणि सकस व ताजा आहार द्यावा.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!