Pune Fire News : मोठी बातमी! पुण्यातील कसबा पेठ परिसरातील तीन मजली इमारतीला भीषण आग..

Pune Fire News : पुण्यातील कसबा पेठ परिसरातील मोटे मंगकार्यालयाजवळ असलेल्या तीन मजली इमारतीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. भीषण आग सोमवारी (ता.११) पहाटेच्या सुमारास लागली.

आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे ६ बंब घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. सुदैवाने ही इमारत बंदस्थितीत असल्याने तेथे कुणी वास्तव्यास नव्हते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. Pune Fire News
दरम्यान, आगीत इमारतीचे नुकसान झाले आहे. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली? याचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. शॉर्ट सक्रीटमुळे आग लागली असावी, असा अंदाज अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यानी व्यक्त केला आहे.

या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आग लागल्याचे कळताच परिसरातील रहिवाशांनी आरडाओरड सुरू केली. काहींनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र, भडका उडाल्याने आग नागरिक घाबरले.