Pune : पुण्यात सोन्याने भरलेला ट्रकच सापडला! ट्रकमध्ये तब्बल १३८ कोटींचे सोनं बघून सगळेच हादरले.

Pune : विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून, राज्यभर आता निवडणूक अधिकारी तसेच पोलिसांकडून नाकाबंदी आणि तपासण्या सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी पुण्यातील खेड शिवापूर येथे एका गाडीत पाच कोटी रुपये सापडल्याची घटना ताजी असताना शुक्रवारी सकाळी पुण्यातील सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुणे पोलिसांच्या नाकाबंदीत १३८ कोटींचं सोनं पकडलं होते.

सातारा रस्त्यावर सकाळच्या सुमारास पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीमध्ये हे कोट्यावधींचे सोने जप्त करण्यात आले आहे. एक संशयित वाहन या रस्त्याने येणार होते अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी हा ट्रक अडवला.

यामध्ये तब्बल १३८ कोटी रुपयांचे सोने सापडले. यामध्ये सोन्याचे दागिने होते. अर्थात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात ही सोन्याची डिलिव्हरी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवलेली आहे. Pune

काही दिवसांपूर्वीच खेड शिवापुर टोल नाक्यावर पाच कोटींची रोकड जप्त करण्यात आल्यानंतर ही रोकड एका आमदाराशी संबंधित असल्याची चर्चा रंगली होती. मात्र त्यानंतर हे प्रकरण थंड पडले. तेवढ्यात जामनेर तालुक्यातही दीड कोटी रुपये पोलिसांना एका गाडीत आढळून आले होते. सध्या निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक तालुक्यात नाकाबंदी केली जात आहे.
दरम्यान, यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर रकमा सापडत आहेत. नोटाबंदीनंतर दोन लाखापेक्षा अधिक रक्कम हाताळता येत नसल्याचे शासनाचे नियम असूनही आचारसंहितेच्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणावर नाकेबंदी असण्याची शक्यता असतानाही रोकड अथवा सोने फिरत असल्याने नागरिकांच्या वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत
